एक मुठ धान्य” उपक्रमात शिवांजली इंग्लिश स्कूलचा मदतीचा हात – कोळे येथील अनाथ मुलांसाठी धान्यदान
प्रतिनिधी शशिकांत माथाणे
पाटण :- समाजातील गरजू आणि अनाथ मुलांसाठी “एक मुठ धान्य” या उपक्रमातून नाडे येथील शिवांजली इंग्लिश मिडियम स्कूलने प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांमध्ये दातृत्व, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत, कोळे (ता. कराड) येथील जिजामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या “जिजाऊ शैक्षणिक वस्तीगृहातील” अनाथ मुलांना धान्याचे वाटप करण्यात आले.या वेळी संस्थेचे संस्थापक समिर नदाफ सर यांच्याकडे
विद्यार्थ्यांनी गोळा केलेले धान्य मुख्याध्यापक सचिन यादव यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा मोलाचा सहभाग होता.मुख्याध्यापक सचिन यादव यांनी सांगितले की, “माझ्या शिक्षक सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी अनाथ मुलांसाठी जे पाऊल उचलले, ते खरंच कौतुकास्पद आहे. हा उपक्रम पुढेही नियमितपणे राबविण्यात येईल. पालकांनीही विद्यार्थ्यांना यात सहकार्य करावे, ही विनंती.”या उपक्रमामुळे मुलांमध्ये सहानुभूती, सामाजिक जाणिवा आणि माणुसकीच्या मूल्यांची जाणीव निर्माण होत असून, शिवांजली इंग्लिश स्कूलचे हे कार्य इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













