रामटेक पारशिवनी टुरिझम हब मुळे सर्वाना रोजगार संधी
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
डाँ. राजेश ठाकरे यांच्या प्रस्ताव
नागपूर (रामटेक) :- रामटेक व पारशिवनी येथील धार्मिक व ऐतिहासिक धरोवर तसेच नैसर्गिक जंगल व पहाडी याचा वापर करून नव्याने तयार होणाऱ्या रामटेक पारशिवनी टुरिझम हब अंतर्गत रामटेक पाराशिवनी व मौदा तालुक्यातील सर्व युवक शेतकरी यांना मिळणार विविध रोजगाराच्या संधी तसेच स्वतःच्या व्यवसायाच्या संधी मिळणार.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार होणार रामटेक पाराशिवनी टुरिझम हब भव्य दिव्य मनोरंजन पार्क मुळे व जागतिक स्तराच्या इंटरटेनमेंट सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रिसॉर्ट्स अँड हॉटेल, वॉटर पार्क , जंगल सफारी आर के लॉजिकल म्युझियम डब्ल्यूसीएल व मोईल पर्यटन अंबाळा तलाव सौंदर्यकरण बोटिंग सोबतच गड मंदिर रामटेक वर रामायण लेझर शो ,तर महाकवी कालिदासाचे महाकाव्य मेघदूतवर म्युझिकल फाउंटेन शो व सर्व दोन्ही राज्या मधून येणाऱ्या पर्यटकांकरिता तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांकरिता विविध ३ रेल्वे नेटवर्कच्या सोयीमुळे रोजच्या १ लक्ष पेक्षा अधिक पर्यटक रोज रामटेक व पारशिवनी मध्ये येणार अर्थातच हजारो बेरोजगारा करिता रोजगाराच्या संधी वाढणार ,शेतकरी होणार कृषी पर्यटनामध्ये सामील , रस्त्या रस्त्यांवर होणार स्थानिकांचे ढाबे ,रिसॉर्ट असेच स्थानिक टॅक्सी धारक ऑटो धारक अशा सर्व प्रकारच्या वाहन चालकांना मिळणार मोठ्या प्रमाणावर रोजगार असे डायरेक्ट इन डायरेक्ट रामटेक-पारशिवनी सह नागपूर व भंडारा जिल्ह्यातील सुद्धा लोकांना रोडवर मोठ्या प्रमाणावर होणार रोजगार उपलब्ध.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













