नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्हा सचिव सौ.आकांक्षा रांकित शर्मा-सावंत,व कर्जत तालुक्यातील महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्जत नगरपरिषदेच्या नगर अध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांची घेतली भेट – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्हा सचिव सौ.आकांक्षा रांकित शर्मा-सावंत,व कर्जत तालुक्यातील महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्जत नगरपरिषदेच्या नगर अध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांची घेतली भेट

प्रतिनिधि कर्जत

रायगड (कर्जत) :- महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना रायगड जिल्हा सचिव सौ.आकांक्षा रांकित शर्मा-सावंत,व कर्जत तालुक्यातील महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्जत नगरपरिषदेच्या नगर अध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांची भेट घेऊन कर्जत शहरातील विविध

विषयांवर चर्चा केली.कर्जत शहरातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींसाठी विचारणा केली.सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत हे सांगितले.नगर अध्यक्ष सौ.सुवर्णा जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याची भुमिका दाखवून आपले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले.तसेच कर्जत शहरात असलेल्या महावितरणच्या कार्यालयात धडक देत तालुक्यातील विद्युत वितरणातील समस्यांबाबत जाब विचारला.विद्युत वितरणात वारंवार येणाऱ्या समस्यांबाबत लवकरात लवकर काम करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशी तंबी दिली.सदर प्रसंगी उपस्थित महावितरणचे अधिकारी श्री.प्रकाश देवखिळे यांनी आश्वासन दिले कि येणाऱ्या काही दिवसांत

सर्व प्रश्न मार्गी लागतील.तसेच कर्जत पोलीस स्थानकात सदिच्छा भेट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुरेंद्र गरड साहेब यांच्याशी शहरातील व तालुक्यातील विवीध विषयांवर चर्चा केली.व कर्जत तालुक्यातील नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांची भेट घडवुन दिली.या प्रसंगी उपस्थित मनसे महिला आघाडी रायगड जिल्हा सचिव सौ.आकांक्षा शर्मा-सावंत, कर्जत तालुका सचिव सौ.योगिता शृंगारपूरे,कर्जत तालुका उपाध्यक्षा कु.सेजल नागावकर,व कर्जत शहरातील नागरिक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]