खवटी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये जलसंवर्धन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित , न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पि. के. दरेकर जुनिअर कॉलेज खवटी या प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक २७ जून २०२३ रोजी नेहरू युवा केंद्र रत्नागिरी युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत
जलसंवर्धन हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक कुमारी भाग्यश्री चाळके मॅडम उपस्थित होत्या ,तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळी सर , सौ खेडेकर मॅडम ,श्री सावंत सर, श्री .दळवी सर,सौ. देवळेकर मॅडम ,तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माळी सर यांच्या हस्ते कुमारी भाग्यश्री चाळके मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन येथोचित सन्मान करण्यात आला तद्नंतर मुख्याध्यापक श्री माळी सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून जलसंवर्धन संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.तसेच सौ.सिद्धि देवळेकर मॅडम यांनी या कार्यक्रमासंदर्भात प्रमुख मार्गदर्शन करत जलसंवर्धन ही काळाची गरज आहे व कशा प्रकारे करता येईल हे आपल्या व्याख्यानामधून स्पष्ट केले त्याचबरोबर श्री विजयराजे दळवी सर यांनी देखील जलसंवर्धन या विषयांतर्गत मोलाचे मार्गदर्शन करून पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना स्पष्ट करून देत प्रदूषणावर देखील कशाप्रकारे नियंत्रण ठेवलं पाहिजे व पर्यावरणाचे संरक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपल्या व्याख्यानामधून स्पष्ट केले

तसेच या कार्यक्रमांतर्गत जलसंवर्धन या विषयांतर्गत निबंध स्पर्धा हा उपक्रम राबविण्यात आला . या निबंध स्पर्धेमधून विद्यार्थ्यांचे क्रमांक काढण्यात आले . या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी:- मिनल गजानन सागवेकर द्वितीय क्रमांक कुमारी:- साक्षी कृष्णा कांदेकर तर तृतीय क्रमांक कुमारी महेक मन्सूर जोगीलकर हिने पटकविला या तीनही विद्यार्थ्यांना कुमारी:- भाग्यश्री चाळके मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक माळी सर व सर्व शिक्षक वृंद यांनी सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच

या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली . यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ. खेडेकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजयराजे दळवी सर यांनी केले कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













