नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षक नेते केंद्रीय प्रमुख उदय शिंदे आज सेवानिवृत्त – आजचा महाराष्ट्र

शिक्षक नेते केंद्रीय प्रमुख उदय शिंदे आज सेवानिवृत्त

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- विद्यार्थी प्रिय शिक्षक,शिक्षक नेते, केंद्रीय प्रमुख श्री. उदय चंद्रकांत शिंदे आज ३९ वर्षांची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. १९८४ ला दुर्गम भागातून आपल्या सेवेला प्रारंभ करीत असताना, त्यावेळी दळणवळणाच्या साधनांचा अभाव, शिक्षणासंबंधी अनास्था अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्री शिंदे गुरुजींनी दुर्गम ग्रामीण भागातील ग्रामस्थ व पालकांना आपलेसे करून शैक्षणिक वातावरण व सकारात्मक दृष्टी निर्माण करण्यात यश मिळवले. त्यातूनच दुर्गम ग्रामीण भागात विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. आपल्या मुलाने शिक्षण पूर्ण करून

शिक्षक व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यासाठी त्यांची आई व चुलते बंधु शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री. शिंदे गुरुजींनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून जि प प्राथमिक शिक्षण विभागात आगरनरळ कुणबी वाडी नंबर दोन या दुर्गम भागातील शाळेतून त्यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ झाला. पुढे दांडेआडम वरचीवाडी, चवे निवई, कुरतडे नंबर एक, हरचिरी चिंचवाड नंबर एक, नाचणे नंबर एक, लांजा मठ, सोमेश्वर मराठी नंबर एक आदी शाळांमधून उपशिक्षक, पदवीधर शिक्षक ते उच्च श्रेणी मुख्याध्यापक या विविध पदांवर त्यांनी सेवाव्रती म्हणून योगदान दिले. उप शिक्षक ,उच्चश्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख कारकिर्दीत त्यांनी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये रमणारा शिक्षक अशी शिंदे गुरुजींची ओळख आहे. प्रत्येक शालेय विषयांचे सखोल ज्ञान शिंदे गुरुजींकडे असल्याने ते विद्यार्थ्यांची मने जिंकत. आजही त्यांचे असंख्य विद्यार्थी व पालक शिंदे गुरुजींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आढळून येतात. तसेच हरचिरी केंद्रात सुमारे दहा वर्षे व कर्ला केंद्र (अतिरिक्त) केंद्रामध्ये सुमारे दोन वर्षे केंद्रीय प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडली. केंद्रीय प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळताना श्री. शिंदे गुरुजींनी केंद्रातील शाळांच्या गुणवत्ता दर्जा वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ते नेहमीच संवेदनशील असत. प्रशासकीय कामकाजात त्यांनी वेळेला फार महत्त्व दिले. केंद्रातील शाळांच्या भौतिक सुविधेसाठी ते सतत प्रयत्नशील असत. शिक्षकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र मेहनत घेणारा शिक्षक नेता म्हणून शिंदे गुरुजींकडे पाहिले जाते. पदवीधर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून श्री शिंदे गुरुजींनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शिक्षक नेते विनायक हातखांबकर यांच्या सेवानिवृत्ती नंतर शिक्षक बँकेचा पुढील रत्नागिरीचा संचालक कोण? यावर पदवीधर शिक्षक संघटनेमध्ये निर्माण झालेले वादळ श्री. उदय शिंदेंच्या नावावर एकमताने क्षमले आणि पुढे भरघोस मतांनी श्री शिंदे गुरुजी शिक्षक बँकेचे संचालक म्हणून निवडून आले. पाच वर्षे संघटनात्मक भेदभाव न करता श्री शिंदे गुरुजींनी संचालक म्हणून सर्व सभासदांना आपलेपणाने सेवा दिली. पदवीधर शिक्षक संघटनेमध्ये विविध पदांवर काम करीत असताना सरचिटणीस पदापर्यंतची जबाबदारी सांभाळली.

शिक्षक ते केंद्रीय प्रमुख व शिक्षक बँक संचालक ते संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी पदाधिकारी व अधिकारी, सर्व संघटना, संस्था, शिक्षक सहकारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचे जवळस्नेहभावाचे नाते वृद्धिंगत केले. ह्या सर्वांच्या सहकार्यामुळेच सेवेत आपण यशस्वी झाल्याचा कृतज्ञ भाव शिंदे गुरुजी व्यक्त करतात. आपण शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना शिंदे गुरुजी यांनी शाळा व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, लेक वाचवा, आरोग्य, मतदानाचा हक्क, वृक्षारोपण – संवर्धन, आपत्कालीन व्यवस्थापन, कुटुंब कल्याण, बंधारे, वीज बचत, पाणी बचत, रोजगार निर्मिती, गरीब गरजूंना मदत, असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. श्री शिंदे गुरुजी यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. आज रोजी नियमित वयोमानानुसार शिंदे गुरुजी निवृत्त होत असताना त्यांच्या कार्याच्या “पाऊल खुणा” शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी ठरतील. त्यांना पुढील आयुष्य निरोगी व समाधानाचे लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. -महेंद्र दळवी, रत्नागिरी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]