तिसऱ्या राष्ट्रीय लाठी अजिंक्य स्पर्धेत पायल आंबेरकरचे उत्तुंग यश पायलने मिळविले दोन सिल्वर मेडल

रत्नागिरी :- लाठी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय लाठी अजिंक्य स्पर्धेत पायल आंबेरकरचे द्वेलाठी आणि पंचआणिकाह लाठी या दोन्हीही लाठी प्रकारात 
सिल्व्हर मेडल मिळवून उत्तुंग असे यश मिळवले आहे. पायल आंबेरकर ही सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल जालगाव, दापोली येथे सहावी मध्ये शिकत असून रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक राकेश आंबेरकर यांची ती कन्या आहे. या आधी शोतोकान
कराटे या प्रकारात तिने राज्यस्तरावरही आपली चमक दाखवली आहे. ती कराटे मध्ये इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. या व्यतिरिक्त सायकलिंग तसेच सुत्रसंचालन करण्यातही तिला विशेष रस आहे. या तिसऱ्या राष्ट्रीय लाठी अंजिक्य स्पर्धेमध्ये देशभरातून एकूण २३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी तिचे कोच सुरेंद्र शिंदे सरांचे अधिक मार्गदर्शन लाभले.
या तिच्या यशाबद्दल तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका गुजराथी मॅडम यांनी विशेष कौतुक केले. त्याचबरोबर परिसरातूनही या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













