रोह्याततालुक्यात जंगलाची सुरक्षा रामभरोसे..!वनअधिका-याकडून दुर्लक्ष ? जंगलभागातील बेकादेशीर दारूच्या हातभट्टीला अभय

रायगड रोहा :- सध्या रोहा तालुक्यातील वन संपदेची दुर्दशा पाहता जंगलाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. रोहा तालुक्यात जंगलाना आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वन विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. दर महिन्यात कुठे ना कुठे तरी आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. वन्यप्राणी, पशुपक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येत असून औषधी वनस्पती व रानमेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,

रोहा तालुक्यात निवी ,तळवली,लाढर ,ताबंडी मेढा, या जंगल परिसरात भर दुपारी आग लागुन मोठया प्रमाणात वनराई जळून खाक झाली आहे.ग्रामस्थ काही शेतकरी आदींनी आग विझवण्यासाठी अथक परिश्नम घेतले.एका महिन्यात परिसरात घडलेली ही दुसरी मोठी दुर्दैवी घटना होती. वृक्ष लागवडीचा दरवर्षी आकडा जाहिर होतो. लागवड केलेल्या या वृक्षांचे रक्षण करणे क्रमप्राप्त व जबाबदारीचे आहे. पण येथे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे दोन वेळा येथे आग लागण्याचे प्रकार घडले. या आगीत मुके प्राणी बिचारे जीव गमावून बसले आहेत हे मुके प्राणी जीव वाचवण्यासाठी कोणाला हाक मारतील बरं? जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची असताना सदर प्रकाराकडे डोळे झाक करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वनविभागात असणा-या वनपाल व वनरक्षक यांचेवर राज्यवनमंत्री यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जंगल व निसर्ग प्रेमीकडुन केली जात आहे.
नववर्षांच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात जंगल आगीत होरपळत राहिले, तर रोहा तालुक्यातील जंगलाना आग लावण्याचे प्रमाण वाढले आहे . उदवणे भुनेश्ववर ,मेढा पिंगळसई ,चणेरा, या विभागात मोठया प्रमाणात आग लावली गेली होती.याच्यावर उपायजोजना म्हणून वनविभागाकडून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वन सेवकाकडे दिलेली जबादारी योग्य पद्धतीने जंगलाचे संरक्षण करतो की स्वतःचा स्वार्थ साधतो त्याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजे आहे.जंगलभागात पेटणा-या दारूच्या भट्टीला अभय देणा-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच जंगलात पेटणा-या दारू भट्टीला लागणारा लाकूडफाटा वनकर्मचाऱ्यांच्या सगनंमताने वापरला जात असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या मालकीवर मारतात डल्ला

रोहा तालुक्यातील शेतक-याकडुन वृक्ष खरेदी करून व्यापारी वनविभागाकडून पुर्व परवानगी घेतात अशा प्रामाणिक व्यापाऱ्याला वनविभागातील कर्मचारी त्रास देत आहेत. सर्व व्यापारी परवानगी नुसार पास घेऊन वाहने वाहतुक करत असतात . मात्र वन विभाग कुठे ना कुठे तरी हेतूपुरस्पर अर्थकारण करण्यासाठी चुक काढतो त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रासला सामोरे जावे लागते. अशा कर्मचाऱ्यांची राज्याचे वनमंत्री यांनी खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबन करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकाडून जोर धरत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













