नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तिसंगी येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न – आजचा महाराष्ट्र

तिसंगी येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

प्रतिनिधि राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- अष्टविनायक कला, क्रीडा, सेवा मंडळ (रजि.) तिसंगी ता. खेड आयोजित कै. विजयराजे भोसले स्मृती चषक क्रिकेट राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच तिसंगी येथे ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाल्या. सलग तीन दिवस संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी गाव टू गाव म्हणजेच ग्रामीण भागातील संघांना संधी देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी मुंबई, उपनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसह गुजरात,कर्नाटक, गोवा या राज्यातून आलेल्या खेळाडूंचा भरणा असणाऱ्या वीस संघाने भाग घेऊन या स्पर्धेचा हा दिवस गाजवला. शहरी भागातील या खेळाडूंचा कौशल्य पूर्ण खेळ बघून क्रीडा रसिक मंत्रमुग्ध झाले. तिसऱ्या दिवशी अंतिम फेरीचे सामने होऊन या स्पर्धेतील कै. विजयराजे भोसले स्मृती चषक -२०२३ वर श्री. प्रशांत जाधव यांच्या नवतरुण क्रीडा मंडळ कुळवंडी, जांभूळवाडी यांनी आपले नाव कोरले. तर उपविजेते होण्याचा मान व्यवस्थापक श्री.रॉबिनशेठ भोसले यांच्या दुर्वा इलेव्हन या संघाने पटकावला. तृतीय क्रमांक आर.जे. इलेव्हन मीरा रोड, ठाणे येथून आलेल्या संघाने तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी यजमान अष्टविनायक हा संघ ठरला. विजेत्या संघाला ३३,३३३/-₹ रोख व आकर्षक चषक उपविजेते संघाला २२,२२२/-₹ रोख व चषक तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाला ५,५५५/- ₹ व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.      

 याच बरोबर या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सामनावीर ठरलेल्या खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले.अंतिम सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर यांनाही आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी देणगी देणारे सर्व देणगीदार व मान्यवर यांना मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

  उत्तम व दर्जेदार आयोजन आणि संयोजनाबाबत या स्पर्धेला उपस्थित राहिलेले सगळे मान्यवर व स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंनी अष्टविनायबद्दल गौरव उद्गार काढले. या स्पर्धेदरम्यान तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा,सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.

 स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री.शैलेश भोसले, उपाध्यक्ष श्री.रोशन भोसले यांचे सह मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

    स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आश्रयदाते, देणगीदार, हितचिंतक या सर्वांना अष्टविनायक कला, क्रीडा,सेवा मंडळाच्यावतीने विशेष धन्यवाद देऊन या स्पर्धेची सांगता करण्यात आली

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]