नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार रामचंद्र घोडमोडे राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित – आजचा महाराष्ट्र

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार रामचंद्र घोडमोडे राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधि श्रीवर्धन 

रायगड (श्रीवर्धन) :- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे संपन्न झाला.

 समाजाला दिशा दाखविण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन गेल्या दहा वर्षापासून करीत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यातून पुरस्कारार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मेघा पाटील, माजी मनपा सभागृह नेते व मा. नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. दिनेश क्षिरसागर, आंतरराष्ट्रीय जादुगार शिरीषकुमार हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला अभिनेत्री स्मिता प्रभू, आंतरराष्ट्रीय जादुगार स्नेहराज इंद्रजीत, डॉ. प्रा. शोभा सातभाई, ड्रीम डेस्टीनेशनच्या संचालिका शबनम खान, पैठणी उद्योजक अमोल शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये उपस्थितीतां मधून लकी ड्रॉ काढून त्यांना कलासाई पैठणी यांच्या वतीने पैठणी व ड्रीम डेस्टीनेशनच्या वतीने गिफ्ट हाऊचर भेट देण्यात देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र देशपांडे यांनी केले तर आभार माधुरी देशपांडे यांनी मानले.तर सुत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]