नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चिखलगाव येथे ‘लोकनिर्माण युवा शिबीर’ मोठ्या उत्साहात संपन्न लोकसाधना संस्थेचा स्त्युत्य उपक्रम – आजचा महाराष्ट्र

चिखलगाव येथे ‘लोकनिर्माण युवा शिबीर’ मोठ्या उत्साहात संपन्न लोकसाधना संस्थेचा स्त्युत्य उपक्रम

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (दापोली) :- लोकसाधना, चिखलगाव, ता. दापोली या संस्थेमार्फत दि. २५ डिसेंबर ते ०३ जाने.२०२३ या दहा दिवसाच्या कालावधीत ‘लोकनिर्माण युवा शिबीराचे’ आयोजन करण्यात आले होते. या प्रकारच्या शिबिराचे हे चौथे वर्ष आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी हे शिबीर दरवर्षी घेतले जाते. या शिबिरासाठी सुमारे ५०० ते ५५० अर्ज येतात. प्राप्त झालेल्या अर्जातून निवड प्रक्रीयेद्वारे शिबीरार्थींची निवड केली जाते.

या वर्षी या शिबीरात संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच तामिळनाडू व उत्तरप्रदेश येथून सुमारे ६० युवक युवतींची निवड करण्यात आली होती. दरवर्षी शिबिराचा एक विषय घेऊन शिबीर केले जाते. या वर्षी “मानसिक आरोग्य” असा विषय घेण्यात आला होता.

या दहा दिवशीय शिबीरात विविध उपक्रमाबरोबरच डॅा. शिरीषा साठे (जेष्ठ मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक) श्री. सारंग मांडके व श्री. सारंग भोइरकर (गोष्ट इथे संपत नाही..!! – पुणे) श्रीम. मानसी आमडेकर (मानसशास्त्रज्ञ), सौ. धनश्री दांडेकर अशा तज्ञांचे मार्गदर्शन शिबीरार्थींना लाभले.

युवकांमध्ये सामाजिक कार्याकडे पहाण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण व्हावा. या हेतूने दरवर्षी या शिबीराचे आयोजन केले जाते. समाजाच्या अनेक स्तरातील, विविध अभ्यासक्रम शिकणारी मुलं या शिबिरात भाग घेतात. या शिबिराचे संपूर्ण नियोजन हे संस्थेचे विश्वस्त श्री.कैवल्य दांडेकर यांनी केले. तसेच काही शिबिरार्थीनी स्वयंसेवक म्हणुन काम पाहिले.

या शिबीरात समाजामध्ये कशा पद्धतीने वावरायचे, कसे आचरण करायला हवे आणि चांगला माणूस म्हणून कसे जगायला हवे हे शिकलो. असे उद्गार अनेक शिबीरार्थीनी शेवटी काढले. तसेच दहा दिवस शिबीरात एकत्र कुटुंबाप्रमाणे राहत होतो आणि शिबीर संपल्यामुळे आता वेगवेगळे होणार म्हणून अनेक शिबीरार्थी शिबीराच्या शेवटी भावूक झाले होते. या शिबीराच्या निमित्ताने राष्ट्र उभारणीच्या कामात भावी नागरीक घडविण्याचा लोकसाधनेचा हा छोटासा प्रयत्न आहे. असे शेवटी संस्थेचे विश्वस्त अॕड. कैवल्य दांडेकर यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]