नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आरे बुद्रूक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करत शिक्षिकांना पुरस्कार देऊन पत्रकार संघाने केला सन्मान – आजचा महाराष्ट्र

आरे बुद्रूक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करत शिक्षिकांना पुरस्कार देऊन पत्रकार संघाने केला सन्मान

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- तालुक्यातील केंद्रीय शाळा आरे बुद्रूक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पत्रकार मित्र संघ , आरे बुद्रूक शाळा व कुंडलिका समाजिक विकास संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना , आदर्श शिक्षिका केन्द्र प्रमुख विद्या रोहेकर व अन्य शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष सचिन साळुंखे, कुंडलिका सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष रमेश जोशी यांच्या माध्यमातुन गेली अनेक वर्षे विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत उत्तम असे भाषण केले. यावेळी ग्रामसेवक पाटील, रमेश जोशी, पत्रकार सचिन साळुंखे, सागर कोकरे, रवींद्र देशमुख, माहित काका या मान्यवरांसह

विद्या रोहेकर , केंद्रप्रमुखा केंद्र आरे बुद्रुक,. संगीता कनोजे , रिना दांडगे , सारीका गंधवाले ,ब्रिजेश भादेकर सर, शाळा खातेलीवाडी. श्री. विनायक शिंदे सर शाळा आरे खुर्द यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले

 

 

 

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]