आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे द.. द.. दारूचा नव्हे द.. द.. दुधाचा या संकल्पनेतून नागरिकांना मसाला दूध वाटप. मसाला दूध वाटप करून दारू सेवन न करण्याबाबत जनजागृती ! नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक !
{ प्रतिनिधि पनवेल }
रायगड (पनवेल) :- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई विविध हॉटेल, पब्स, बार किंवा इतर नामांकित ठिकाणी जल्लोष करण्यासाठी तयार असते.

३१ डिसेंबर असला कि सगळीकडे पार्ट्या आयोजित केलेल्या असतात. हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी असते. या दिवशी तरुणाई मध्यरात्री आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडत असतात तर काहीजण १२ 
वाजेपर्यंत मद्यपान करण्यात व्यस्त असतात यामुळे नंतर असुरी शक्ती अंगात येऊन भरधाव वेगाने वाहने चालवणे, धिंगाणा मस्ती करणे अशा प्रकारचे प्रकार होऊन तरुण रस्ते अपघातात आपला जीव गमावतात तर काही जण पुढचे काही महिने तुरुंगात काढतात यासर्वात त्रास फक्त घरच्या लोकांना होती याची जाणीव ठेवूनच समाजसेवक तथा पत्रकार केवल महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार ३१ डिसेंबर २०२२ रोजी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे नागरिकांसाठी मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांना द.. द.. दारूचा नव्हे तर द.. द.. दुधाचा हि संकल्पना राबवून व्यसनाधीनतेने होणारे 
नुकसान याबाबत संस्थेतर्फे जनजागृती करण्यात आली. यावेळी पनवेल शहरातील २००० ते ३००० लोकांनी मसाला दुध पिऊन नववर्षाचे स्वागत केले तर संस्थेच्या या सुंदर उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी अनेक सुजाण नागरिक या कार्यक्रमास भेट देत होते. “दारू करते बुद्धी भ्रष्ट, का करता जीवन नष्ट” हा संदेश मसाला दूध वाटप करतेवेळी प्रत्येक नागरिकांना देण्यात आला. पनवेलमधील 
आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेल्या या अनोख्या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे कोकण प्रांताध्यक्ष अविनाश पाटील, पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे,पत्रकार संजय कदम, रवींद्र गायकवाड, अनिल कुरघोडे, समाजसेवक भरत जाधव, रहीस शेख, उज्ज्वल पाटील, महेश भगत, किशोर पुरोहित, इस्माईल तांबोळी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व समाजसेवक आदी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













