पनवेल नवी मुंबईत मध्ये सोनसाखळी चोरण्याच्या घटनेत वाढ..
पनवेल प्रतिनिधि
रायगड (पनवेल) :- नवी मुंबई व पनवेल मध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळून जाण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. असाच प्रकार पनवेल मध्ये शिवाजी चौकात घडला आहे. रिक्षात एक महिला प्रवासी बसली होती. या महिलेचे पती व सून औषध आणण्यासाठी मेडिकल मध्ये गेले असता या दरम्यान एक अज्ञात तरुण पत्ता विचारण्याच्या निमित्ताने रिक्षा चालका जवळ आला. आणि संधी साधत त्या महिलेच्या गळ्यातील ५८ हजार रुपयांच्या किमतीचे सोण्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाला. सदर महिला (५८ वय) करंजाडे येथील रहिवासी आहे. या घटनेची तक्रार पनवेल शहचीर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस पुढील तपास करत आहेत.

दुचाकी वापर करून रस्त्यावर जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणे, प्रवाशी बहाण्याने रिक्षा चालकास लुटणे, ATM कार्ड आदला बदल करून पैशाची चोरी करणे. चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणे. रस्त्यामध्ये मोबाईलवर बोलत असताना मोबाईल पळवणे. अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार पनवेल नवी मुंबईत घडत आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये आणि विशेष म्हणजे महिलांमध्ये असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतेक वेळा सोनसाखळी चोरताना महिला जखमी होतात. त्यामुळे रस्त्यावरून चालताना त्यांना नेहमी असुरक्षितता जाणवते. आणि यामुळेच बहुतेक वेळा पोलिसांच्या कामावर ही प्रश्नचिन्ह उभे राहतात. परंतु पोलिसांच्या वतीने नेहमी या प्रकारापासून वाचण्यासाठी जनजागृती केली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी CCTV लावण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येते. आणि सार्वजनिक ठिकाणी CCTV लावण्याचे काम शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित आणि सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. गळ्यात जर सोन्याचे दागिने असतील तर त्यांनी सुरक्षित पणे त्यांना जपावे आणि त्या दरम्यान अनोळखी इसमापासून सावधान राहावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वर बोलताना, रिक्षात प्रवाशी बसवताना, ATM मधून पैसे काढताना सावधान आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. आपली सुरक्षा आपली जबाबदारी….
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













