मुरुडमध्ये बुरुड समाजाचा वर्धापन दिन संपन्न

रायगड (मुरुड जंजिरा) :- मुरुड तालुका बुरुड समाज या संस्थेचा ४२ वा.वर्धापन दिन रविवार दि.२५ डिसेंबर रोजी कुंभार वाड्यातील गावदेवी जरीमाता सामाजिक सभागृहात बुरुड समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष रुपेश जामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष अशोक करंबत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

रायगड जिल्हा बुरुड समाज महिला आघाडी अध्यक्षा सिद्धीताई मोरे ,बरुड समाज कोकण विभाग अध्यक्ष सुदीन सावंत,रायगड जिल्हा बुरुड समाजाचे माजी अध्यक्ष राजेश मोरे, राजेश खैरे,कोकण विभाग बुरुड समाजाचे माजी अध्यक्ष संदेश नागे, बुरुड समाजाचे तालुका अध्यक्ष अशोक करंबत, माजी अध्यक्ष सुधीर नागे, उपाध्यक्ष दिपक तेलंगे, राकेश किल्लेकर, सचीव नंदकुमार सोनकर, सहसचिव सुजन खैरे, खजीनदार महेंद्र सोनकर, सल्लागार दिलिप जामकर,उदय किल्लेकर, उपखजीनदार विजय महाले,, हिशेब तपासनीस द्वारकानाथ गायकवाड, विभाग प्रमुख महेश जामकर (मुरुड शहर),महेश साळुंखे(साळाव), मनोहर किल्लेकर (बोर्ली), निलेश गायकवाड (मजगांव),संध्या नागे,शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांसह समाज बांधव उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संध्या नागे व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आली.
मुरुड तालुका बुरुड समाजाचे सचिव नंदकुमार सोनकर यांनी प्रास्ताविक केले तर समाजातील विविध समस्या अडचणी संस्थेच्या कार्याचा व भविष्यकालीन योजनेचा आढावा बुरुड समाजाचे माजी तालुका अध्यक्ष सुधीर नागे गुरुजी यांनी घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे रुपेश जामकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुरुड तालुका बुरुड समाज संस्थेच्या कार्याचा गौरव करून उपस्थित समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून न सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पास झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण करण्यात आले.या समारंभात शालेय आणि महाविद्यालय शैक्षणिक मध्ये उत्कृष्ट गुण संपन्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी “स्मृतिचिन्ह” आणि पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
मुरुड तालुका बुरुड समाज संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबत कार्याध्यक्ष राजेंद्र जामकर, जिल्हा प्रतिनिधी सुधीर नागे, सचिव नंदकुमार सोनकर महेंद्र सोनकर, दिपक तेलंगे, राकेश किल्लेकर द्वारकानाथ गायकवाड, सुजन खैरे,विजय महाले, दिलीप जामकर, उदय किल्लेकर, महेश जामकर, मयूर साळुंखे, मनोहर किल्लेकर, निलेश गायकवाड तसेच संस्थेचे गटकार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













