नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर – आजचा महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर

पत्रकार राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाने आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता हा पुरस्कार देवून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या ग्रंथालय चळवळीमधील कार्यकर्त्याना आदर्श ग्रंथालय सेवक हा पुरस्कार देऊन या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येते. सन २०२२-२३ या वर्षामध्ये ग्रामीण ग्रंथालय चळवळीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचक निर्माण करण्यासाठी, घरोघरी ग्रंथसंपदा पोहचविण्यासाठी पराकष्टा घेणाऱ्या श्री दत्त ग्रंथालय लवेल, ता. खेडचे संचालक श्री. सदानंद वसंत कुलकर्णी व ज्ञानदीप वाचनालयाचे कसबा, ता. संगमेश्वरचे संचालक श्री. किशोर देवजी चांदे यांना आदर्श ग्रंथालय

कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्याचबरोबर ग्रंथालयाच्या ग्रंथसंपदेमध्ये वाढ करून वाचकांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सी. अंतरा अभिषेक रहाटे ग्रंथपाल स्व. आम सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय, रत्नागिरी मु. पो. नाचणे, रत्नागिरी व श्री शिवराज विश्वनाथ कदम ग्रंथपाल पंचक्रोशी जीवनबोध सार्वजनिक वाचनालय, जामगे, ता. दापोली यांना आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे… सदर पुरस्कारकर्त्याना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गौरवपत्राने रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या दि.०१जानेवारी, २०२३ रोजी ज्ञानदीप वाचनालय, मु.पो. कसबा, ता. संगमेश्वर, जि.. रत्नागिरी येथे संपन्न होणाऱ्या अधिवेशनामध्ये गौरविण्यात येणार आहे.पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते व सेवकांचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ बापट,उपाध्यक्ष श्री. संभाजी सावंत, प्रमुख कार्यवाह श्री. श्रीकृष्ण साबणे, कोषाध्यक्ष श्री. गजानन

कालेकर, सहकार्यवाह श्री. महेंद्र दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]