अपघातग्रस्त ग्रुपचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

रायगड (खालापूर) :- खालापूर तालुक्यातील कारगाव येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या घातपात प्रकरणी मदत केल्यामुळे अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी टिमला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडून २५ हजाराचे रिवार्ड देण्यात आले.
खालापूर तालुक्यातील अपघात त्यांच्या मदतीसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या टिमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील मुंबई पुणे दुर्गती महामार्ग असो किंवा अन्य राज्य महामार्ग असो याया सर्व मार्गांवर होणारे अपघात समजतात तात्काळ मदतीसाठी धाव घेणारी संस्था म्हणून या संस्थेचा उल्लेख आदराने केला जातो,अनेक वेळा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन पोचण्या अगोदरच अपघातग्रस्त सामाजिक संस्थेची टीम आपली सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येते या सेवाभावी मनोवृत्तीचा रायगडच्या पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

खालापूर येथील कारखाना या गावातील एका आठ वर्षाच्या मुलीचा निर्दयी पध्दतीने खून करण्यात आला होता.ही बाब तपासाच्या दृष्टीने अवघड वळणावर येऊन ठेपली होती. या गोष्टीची सर्वात प्रथम माहिती देण्याचे काम हे याच अपघातग्रस्त ग्रुप टीमने केले होते.त्या अनुषंगाने रायगडच्या पोलीस दलाला तपास करणे सोपे झाले. रायगडचे पोलीस दल गेल्या सहा दिवसांपासून आरोपीच्या शोधात होते तो आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने घटनेची खरी माहिती सर्वांसमोर आली.पोलीस या घटनेचा तपास करीत असतांनाच त्यांच्या तपासात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अपघातग्रस्त टिमने तालुक्यातील पत्रकारांना घटने बाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध न करण्याचे आवाहन केले होते.तालुक्यातील बहुतांश पत्रकार हे अपघातग्रस्त टिमचे सदस्य असल्याने त्यांनी सुध्दा कोणत्याही प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले नव्हते यामुळे तपासाची दिशा न बदलता अखेर रायगडच्या पोलिसांना आरोपी पर्यंत पोहोचण्यात यश मिळाल्याने आज रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे खालापूर पोलीस स्टेशन मध्ये आले असता त्यांनी खालापूर तालुक्यातील अपघातग्रस्त टिमचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांना बोलून त्यांच्या टीमचे अभिनंदन करून जिल्हा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून २५ हजाराचे रिवार्ड देण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













