नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लातूर मध्ये झालेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत पनवेल मधील चार खेळाडूंनी मारली बाजी… – आजचा महाराष्ट्र

लातूर मध्ये झालेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत पनवेल मधील चार खेळाडूंनी मारली बाजी…

पत्रकार अभिनव येवले

रायगड (पनवेल) :- दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी लातूर मध्ये नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत ६ ते १४ वयोगटातील चार खेळाडूंनी विजयावर शिक्कामोर्तब करून सुवर्णपदक पटकावली आहेत. हे खेळाडू पनवेल तालुक्यातील उसर्ली मधील रहिवासी आहेत. या चार खेळाडूंची निवड आता आसाम गुहाटिला होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग २०२३ या स्पर्धेसाठी झाली असल्याचे वृत्त त्यांचे प्रशिक्षक योगेश बईकर यांनी दिली आहे. त्यामुळे या सर्व लहान खेळाडूंचे पनवेल मध्ये कौतुक केले जात आहे.

उसर्ली मध्ये युनायटेड शोटोकन कराटे असोसिएशन इंडिया, या कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राची शाखा आहे. या शाखेत अनेक मुले व मुली कराटे चे प्रशिक्षण घेत आहेत. याच शाखेत प्रशिक्षण घेत असणारे १) स्वयंम जाधव ( वय १२), २) हर्ष धनावडे ( वय १२), ३) तनिष कांबळे ( वय १२), ४) रुद्रा बईक ( वय ७), या चार खेळाडूंची निवड लातूर मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेत भारतातील इतर राज्यातील खेळाडूंनी ही सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांना मागे टाकत. (५०) वजनी गटात असलेल्या तनिष कांबळे, (४५) वजनी गटात असलेल्या स्वयंम जाधव, (४०) वजनी गटात असलेल्या हर्ष धनावडे तसेच सर्वात लहान (२०) वजनी गटात असलेल्या रुद्रा बईकर यांनी बाजी मारत सुवर्णपदकावर आपली नावे कोरली. आणि जानेवारी २०२३ आसाम गुहाटिला होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. या सर्व खेळाडूंचे उसरली त कौतुक केले जात आहे. आता हे खेळाडू पुढील स्पर्धेसाठी कसून तयारी करत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक योगेश बईकर यांनी दिली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]