नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हिंदू देव देवतांची विटंबना. अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे विरुद्ध कारवाई साठी हिंदू एकता संघाचा भव्य मोर्चा – आजचा महाराष्ट्र

हिंदू देव देवतांची विटंबना. अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे विरुद्ध कारवाई साठी हिंदू एकता संघाचा भव्य मोर्चा

पत्रकार रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी सांप्रदाय व हिंदू देवतांच्या विरुद्ध केलेले बेताल वक्तव्य त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यात सर्वत्र नाराजीचे सूर उमटले असून अनेक ठिकाणी त्यांच्या विरुद्ध निषेध मोर्चे काढले जात आहेत. वारकरी सांप्रदायिक तसेच काही

संघटनें कडून सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ सुद्धा घेतली आहे. सुषमा अंधारे अनेक कार्यक्रमा प्रसंगी बोलत असताना संत पुरुषांबद्दल बोलताना ” संतांनी रेड्यांना शिकवलं पण माणसांना कुठे शिकवलं”.तसेच प्रभू राम,महादेव, दुर्गामाता. यांच्या बद्दल गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. हिंदूंच्या सणांवर. परंपरेवर वारंवार टीका करत असल्याने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या विकृत कृत्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा कायदा तसेच भारतीय

दंड संहितेच्या योग्य कलमाद्वारे कठोर कारवाई होण्यासाठी श्रीवर्धन हिंदू एकता संघ यांच्या कडून निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. याची सुरुवात सोमजाई देवी पटांगण येथून करण्यात आली. यावेळी श्रीवर्धन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदनाची प्रत उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीवर्धन तसेच तहसीलदार श्रीवर्धन यांना देण्यात आली आहे. सदर मोर्चा प्रसंगी वारकरी संप्रदायातील अनेक मंडळ

उपस्थित होते त्यांच्या कडून भजनाच्या तालावर मोर्चा श्रीवर्धन पोलीस स्टेशन कडे नेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम अशा घोषणा सुध्दा देण्यात येत होत्या.तसेच उपस्थित महिलांकडून सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला चप्पल मारण्यात आल्या. मोर्चा मध्ये हिंदू एकता संघाचे सदस्य तसेच श्रीवर्धन मधील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]