नागोठणे शहरात मोठया प्रमाणात मटका आणि ऑनलाईन जूगार सुरू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?

रायगड (रोहा) :- नागोठणे शहरात गेल्या अनेक दिवसापासून नागोठणे एस टी स्टँन्ड कोळीवाडा रिक्षा परिसरात तसेच मिनिडोअर स्टँन्ड येथे मोठया प्रमाणात मटका जूगार आणि ऑनलाईन जूगार सुरू असल्याचे दिसून येते’ याबाबत सविस्तर वृत्त असे की नागोठणे शहराला मोठे महत्व प्राप्त झाले असून तसेच या शहरात बाजार पेठ असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ असल्याचे दिसून येते,

मात्र या शहराला काही दिवसापासून मटका आणि जूगार खेळाच्या राक्षसाचे ग्रहण लागलेले दिसून येते तर एकीकडे मटका आणि जूगार अड्डे याबाबत पोलीस प्रशासनाला काहीच माहित नाही की माहिती असून देखील पोलीस प्रशासन काहीच माहित नसल्याचे सोंग घेतात की काय याबाबत अनेक जणांच्या मनात शंका उपस्थित होताना दिसत आहे. तर एकीकडे पोलीस प्रशासन या खेळावर कायदेशीर कारवाई करणार का ?असा प्रश्न देखील विचारला जात आहे,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













