रायगड जिल्हा परिषद शाळा बापवली या शाळेला स्वदेस फाउंडेशन सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त

रायगड (श्रीवर्धन) :- स्वदेस फाऊंडेशन मार्फत २०१९/२० या वर्षा मध्ये रायगड जिल्ह्यातील ६ तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट शाळा स्पर्धा हा उपक्रम राबविणेत आला होता. सदर स्पर्धे मध्ये रायगड जिल्ह्यातील १२६ प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या पैकी २६ प्राथमिक व माध्यमिक शाळा अंतिम फेरीसाठी पात्र झाल्या होत्या.

या शाळांचे मूल्यांकन शाळा सिद्धी व स्वदेस धैय या धर्तीवर विविध शिक्षण तज्ज्ञांच्या मार्फत करण्यात आले होते . सदर स्पर्धे मध्ये बापवली शाळेने सहभाग नोंदवून सर्व उपक्रमांची आपल्या शाळेमध्ये यशस्वी अंमलबजावणी केली होती.बापवली शाळेतील विवध उपक्रम, शाळा व्यवस्थापन समिती व पालक सहकार्य या सर्व गोष्टींची मूल्यांकन समिती मार्फत पडताळणी करणेत आली व दिनांक २३/१२/२०२२ रोजी रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे बापवली शाळेस सर्वोत्कृष्ट शाळा या स्पर्धेमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,५०००० रुपये चे पारितोषिक देऊन श्रीम.जरीना मॅडम संस्थपिका स्वदेस फौंडेशन ,डॉ.किरण पाटील सी. ओ. रायगड जिल्हा परिषद,श्रीम.पुनीता गुरव मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलेबापवली शाळेस पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल मुख्याध्यापक निलेश श्रीवर्धनकर तसेच सर्व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ,सर्व पालक.गटशिक्षणाधिकारी श्रीवर्धन यांचे मार्फत अभिनंदन करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













