निरलॉन कॉलनी रस्त्याची दैन्यावस्था, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

रायगड (रोहा) निरलॉन कॉलनी पासून ते पंचायत समिती कालवा रोड या दोन्ही रस्त्यांची वाहतुकीमुळे चाळण होत असते. रोहा शहरापासून १० मिनिटांच्या अंतरावरील या मार्गावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. नेहमीची रहदारी असणाऱ्या या मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रवास करणे कायम डोकेदुखी ठरत असून संथ गतीने चालणार्या वाहनांमुळे वाहतूककोंडी निर्माण होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आणि पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या निरलॉन ते पंचायत समिती पर्यंतच्या रस्त्याने रोहा शहराकडे जावे लागते तसेच कालवा रोड आणि निरलॉन कॉलनी लगतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पाटबंधारे विभागाच्या भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या उभ्या केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला प्रचंड त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांनी जंलसपादा विभागाची साकव पुलाची पूर्वपरवानगी घेतली नसून शासकीय भूंखडावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा हडप केल्या असून भविष्यात या बांधकामावर हातोडा पडणार असल्याचे जंलसपादा विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे .

नागरिकांनी वरसे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामां पैकी स्वत:चा मालकीचा फ्लॅट खेरीदी करताना कुठे फसवणुक होते का हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. कारण सध्या वरसे ग्रामपंचायत हद्दीत ९० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













