आंबवली प्रभागातील देवघर केंद्र शाळेचा विद्यार्थी वेदांत विठ्ठल मोरे नासा इस्रो भेटीसाठी पात्र

रत्नागिरी (खेड) खेड तालुक्यातील दुर्गम अशा देवघर निवाचीवाडी केंद्र शाळेतील विद्यार्थी वेदांत विठ्ठल मोरे याने केंद्र स्तर प्रभाग स्तर व तालुकास्तर निवड चाचणी पार करून मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरी येथे झालेल्या अंतिम चाळणी परीक्षेमध्ये यश मिळवून नासा व इस्रो भेटीसाठी पात्र ठरला रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या यादीत निवड झाल्याने वेदांत वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील १८ विद्यार्थी इस्रो भेटीसाठी व व ९ विद्यार्थी इस्रो व नासा पेटीसाठी पात्र ठरले आहेत इस्रो व नासा भेटीसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांमध्ये खेड तालुक्यातून वेदांत विठ्ठल मोरे याची निवड झाली आहे
वेदांत विठ्ठल मोरे याला देवघर निवाचीवाडी शाळेतील शिक्षिका विधी बने व मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आंबवली प्रभागाचे शिक्षण अधिकारी सखाराम मोहिते व केंद्रप्रमुख विनायक नलावडे यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन वेदांत व शिक्षकांना मार्गदर्शन केलेत्याचप्रमाणे केंद्रप्रमुख विनायक नलावडे आंबवली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सखाराम मोहिते खेडचे गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













