नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आज दिनांक १९ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती खेड श्री.दिघे साहेब यांना तालुक्यामध्ये लम्पी रोगामध्ये मृत्यू पावलेल्या जनावरांचा शेतक-यांना मोबदला न मिळालेबाबत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब यांनी निवेदन दिले. – आजचा महाराष्ट्र

आज दिनांक १९ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती खेड श्री.दिघे साहेब यांना तालुक्यामध्ये लम्पी रोगामध्ये मृत्यू पावलेल्या जनावरांचा शेतक-यांना मोबदला न मिळालेबाबत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब यांनी निवेदन दिले.

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी(खेड) खेड तालुक्यातील लम्पी आजारामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मृत जनावरांचे वैद्यकिय अधिकारी यांनी पंचनामे व कागदपत्र घेऊन बरेच दिवस झाले परंतू आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ शेतक-यापर्यंत पोहोच झाला नाही. वारंवार कळवून आताचे सरकार त्यावर लक्ष देत नाही. अधिवेशन सुरु आजपर्यंत सरकारकडून शेतक-यांच्या खात्यावर रक्कम अदा झाली नाही. यामुळे शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी खेड तालुका पंचायत समिती खेड विभागात शेतक-यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. तरी आपण त्यावर होणा-या आंदोलनास जबाबदार रहाल याची दक्षता घ्यावी. तरी लक्ष केंद्रीत करुन शेतक-याचे रक्कम त्वरीत अदा करावी. हि विनंती आहे असे निवेदन दिले आहे.

*(टिप) :- शासनाने कंत्राटी पध्दतीने पशुवैद्यकिय अधिकारी यांची नेमणूक केली असून शासन त्यांना आजअखेर चार महिने पूर्ण होऊन सुध्दा पगार दिलेला नाही. तरी शासनाने नेमलेले (संस्था) कंत्राटी पद्धतीने यांची नेमणूक बंद करुन त्यांच्या वर कडक कार्यवाही करण्यात यावी. व प्रशासनाने नेमलेले कंत्राटी पशुवैद्यकिय अधिकारी यांचे पगार अदा करावे.

या प्रसंगी जिल्हा परिषद मा.अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.शंकरराव कांगणे,उद्योजक श्री.बशीरभाई हमदुले,लोटे ग्रामपंचायत सरपंच श्री.चंद्रकांत चाळके,खेड नगरपरिषद मा.गटनेते व मा.नगरसेवक श्री.अजय शेठ माने,चिंचघर ग्रामपंचायत मा.उप सरपंच श्री.मदनराव कदम,मा.युवक तालुकाध्यक्ष श्री.सचिन पवार,पशुवैद्यकिय अधिकारी श्री.देशमुख,पशुवैद्यकिय अधिकारी मा.जंगले मँडम,श्री.अक्षय पाटणे,कौतुक.तेजस शेलार सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]