नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , औरंगाबादच्या ग्रामीण भागात यंदा भाजप सरशी.तरुण बनले गावाचे कारभारी.जुन्यांना पाठवले घरी ।। फुलंब्री तालुक्यात १८ पैकी बारा ग्रामपंचायतवर भाजपचे सरपंच.तीन ठिकाणी काँग्रेस.राष्ट्रवादी काँग्रेस.एक शिंदे गट. एक उद्धव गट!! पाथरी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा भाजपची हार।। – आजचा महाराष्ट्र

औरंगाबादच्या ग्रामीण भागात यंदा भाजप सरशी.तरुण बनले गावाचे कारभारी.जुन्यांना पाठवले घरी ।। फुलंब्री तालुक्यात १८ पैकी बारा ग्रामपंचायतवर भाजपचे सरपंच.तीन ठिकाणी काँग्रेस.राष्ट्रवादी काँग्रेस.एक शिंदे गट. एक उद्धव गट!! पाथरी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा भाजपची हार।।

प्रतिनिधी जगदीशकुमार कुंटे

{औरंगाबाद} :- मराठवाड्यात तरुणांना संधी.प्रस्थापितांना जनतेने धक्का दिला? जुन्यांना घरी.नव्या पाहुण्याचं झालं आगमन? ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची मुसंडी.तरुण बनले गावाचे कारभारी।। प्रस्थापितांना खेड्यातील जनतेने पाठवले घरी.म्हणण्याची वेळ?

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भाजपची सरशी.फुलंब्री तालुक्यात १८ पैकी बारा ग्रामपंचायतवर भाजपचे सरपंच निवडून आले? तीन ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी एक शिंदे गट व उद्धव गट एक असे या पक्षांना समाधान मानावे लागले? तालुक्याचे लक्ष लागलेले पाथरी गावाची निवडणूक चुरशीची झाली? भाजपचे दिग्गज नेते शिवाजी महाराज पाथरीकर यांच्या धर्मपत्नी सरपंच पदाचे दावेदार पदाला जनतेने हुलकावणी देऊन राष्ट्रवादीचे राजेंद्रभाऊ पाथरीकर यांच्या धर्मपत्नी वर्षाताई पाथरीकर यांना पसंती दिली?

काही गावात भाजपच्या दोन गटात निवडणुका झाल्या? यावर कोणीजरी आले ते भाजपचे येतील.अशा काही ग्रामपंचायतती होत्या? या तीन बिनविरोध सरपंच झाले.हे तिन्ही सरपंच भाज्याच्या फडातील आहे.

फुलंब्री तालुक्यात पाथरी.खामगाव.पिरबावडा.

बिल्डा.आळंद या ग्रामपंचायत मध्ये चुरशीची निवडणूक होती? या मध्ये भाजपला मोठा धक्का बसला? पाथरी व बिल्डा या दोन पंचायत समितीमध्ये भाजपच्या मानलेल्या दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला?

खामगाव येथील मातब्बर नेते एका बाजूला होते.गंगाधर सोनवणे मोहन सोनवणे व आबाराव सोनवणे हे एकमेकांच्या विरोधक एकत्र आले? भाजपच्या विरोधात आबाराव सोनवणे यांचे चिरंजीव रमाकांत सरपंच पदासाठी हे उमेदवार होते.भाजपचे मनोहर सोनवणे यांनी निवडलेली उमेदवार सोमनाथ सोनवणे हे निवडून आले?

पाथरी येथील जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथरीकडे भाजपातील मान्यवर व्यक्ति आहेत .त्यांच्या पत्नी ह्या निवडणुकीत सरपंच पदासाठीचे उमेदवार होत्या.त्या तिसऱ्या क्रमांकावर आल्या? राजेंद्र पाथरीकर यांच्या धर्मपत्नी श्रीमती वर्षाताई निवडून आल्या.योगेश पाथरीकर पुरस्कृत संभाजी ब्रिगेड समजल्या जाणाऱ्या पॅनलच्या संजय पाथरीकर यांच्या पत्नीने मोठे मताधिक्य घेत दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली.बिल्डा भाजपचे सांडू जाधव हे देखील तालुक्यात नामवंत व्यक्ति आहेत .त्यांच्या पत्नी सरपंच होत्या.यावेळेस सांडू जाधव स्वतः उभे होते.मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. येथे काँग्रेसचे सोमीनाथ मते निवडून आले.फुलंब्री तालुक्यात भाजपचे वर्चस्व असले तरी दिगजांच्या पराभवानी भाजप चिंतेत आहे.

* फुलंब्री तालुक्यातील गावांची नावे व कारभारी पुढीलप्रमाणे *

सरपंच:-शेवता(बुद्रुक) धर्मराज अवचितराव तुपे.

वाघलगाव:-श्रीमती लंकाबाई आप्पाराव काकडे.मुर्शिदाबादवाडी- कृष्णा दीपक पवार.

बिल्डा – सोमीनाथ रामराव मते.नरला – भावडी – विजयमाला कैलास गिरी,खामगाव – सोमीनाथ रघुनाथ सोनवणे .

ममनाबाद:-श्रीमती रुक्‍मणबाई पांडुरंग हावळे.गेवराई (गुंगी) -कविता ईश्वर मस्के . गेवराई पायगा – मंगेश संजय साबळे.पिरबावडा:- डॉ.सारंगधर गाडेकर,पाथरी:-श्रीमती वर्षाताई राजेंद्र पाथरीकर.शेलगाव:-भागुबाई रंगनाथ आटोळे.

वावना-पाडळी:-भागुबाई कैलास काकडे .आळंद:-कैलास त्रिंबक गायके.उमरावती:-श्रीमती मनीषा रखमाजी जाधव,नायगव्हाण जगन्नाथ मिठू दाढे.

चिंचोली(बुद्रुक):-मनीषा बिनोरकर,विरमगाव:-श्रीमती मनीषा कृष्णा कापसे.

औरंगाबाद जिल्ह्यात मतमोजणीच्या ठिकाणी विजयी सरपंचसह सदस्य यांच्यावर फुलांचा वर्षाव करत गुलालाची उधळण करत विजयी मिरवणुका काढल्या पराभूत उमेदवारांचा हिरमोड झाल्याने ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह मागच्या पावलाने निसटले निवडून आलेल्या सरपंचासह सदस्यांनी जनतेला दिले काम करण्याचे आश्वासन

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]