नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ईलेक्ट्रीक बाईक मुळे बचावल्याची अपघात ग्रस्ताची प्रतिक्रीया  – आजचा महाराष्ट्र

ईलेक्ट्रीक बाईक मुळे बचावल्याची अपघात ग्रस्ताची प्रतिक्रीया 

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) – कोलाड रोहा रोड हा अपघाताच्या बाबतीत चर्चेत आहे. या रोडवर एक इसम अपघातातून बालबाल बचावले असुन माझ्या ताब्यात असणारी इलेक्ट्रीक बाईक मुळे मी बचावलो असल्याची  प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.सविस्तर वृत असे की कोलाड कडून रोहा कडे काही कामानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना व शिंदे गटाचे कार्यकर्ते ,आनंद दिघे भक्त व निसर्ग प्रेमी तुकाराम शेट ठाकुर हे काही कामानिमित्त रोहाकडे जात होते. यावेळी

आपल्या ताब्यातील इलेक्ट्रीक मोटारसायकल चालवत असताना, रस्त्यामधे मिनिडोर मधे बसन्याकरिता काही माणसे रस्ता क्रॉस करित होते . अचानक भोळी भाबडी ग्रामीण माणसे समोर आल्याने त्यांचे प्राण वाचवणे महत्वाचे होते.त्यामूळे ठाकुर यांनी प्रसंगावधान राखीत गाडी बाजुला घेण्याचा प्रयत्न केला यामधे त्यांची गाडी कोसो दुर फेकली गेली. ठाकुर यांना दुखापत देखील झाली यावेळी ठाकूर यांनी या इलेक्ट्रीक बाईक मुळे मी कसा वाचलो याचा मजेदार किस्सा सांगितला. ते म्हणाले की या बाईक ला स्पीड कमी असतो. जास्त वेगाने ही गाडी पळत नाही. यावेळी जर माझाकडे पेट्रोल गाडी असती तर मी खुप वेगात असतो व माझा मोठा अपघात झाला असता.  जगामधे नवनवीन क्रान्ती होत असताना इलेक्ट्रीक बाईकची निर्मिती झाली. लोकांना याचा फायदा झाला. या बाईक  मुळे पेट्रोल ची बचत झाली त्यामूळे पैसा वाचला तसेच ध्वनी व वायू प्रदूषण कमी झाले. पर्यावरणाचे रक्षण झाले. तरुण मुले या गाडीवर स्टंट बाजी करणर नाहीत त्यामूळे अपघात टळतील असे फायदे तुकाराम ठाकुर यानी सांगत. अशा अनेक घटना त्यांच्या जीवनामधे घडल्या असुन जमीन फसवणुकीच्या भयंकर प्रकरणात त्यांचे खुप नुकसान झाले आहेत. अशा घटनावर अधारित ते लवकरच एक चित्रपट प्रदर्शित करनार असल्याचेही या निमित्त  त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]