स्टील मार्केट कमिटीतील लिपिक संजय पाटील यांच्या चौकशीचे आदेश…

रायगड (कळंबोली) – कळंबोली मध्ये लोखंड पोलाद बाजार समितीचे कार्यालय आहे. या कार्यालयात लिपिक पदावर संजय पाटील कार्यरत आहेत. या लिपिक पदाचा गैरवापर करत संजय पाटील यांनी लोखंड व पोलाद बाजार समितीच्या परिसरात
बेकायदेशीर पद्धतीने गाळे सुरू केले आहेत. तसेच सिडको ची फसवणूक करून रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या टपऱ्या व भूखंड भाडे तत्वावर देऊन अवैद्य संपत्ती जमवल्याचा आरोप श्री. शशिकांत उंदीर तांडेल या व्यक्तींनी केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी. व बेकायदेशीररित्या सुरू असलेले सर्व धंदे बंद करण्यात यावे. आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी लेखी तक्रार शशिकांत उंदीर तांडेल यांनी केंद्रीय सुविधा भवन, लोखंड पोलाद बाजार समितीचे अध्यक्ष अशोक गर्ग यांच्या कडे केली आहे. त्याचबरोबर सिडको, कार्यालय बेलापूर येथे ही केली आहे. या अर्जाची गंभीर दखल घेत या सर्व प्रकारच्या चौकशी करून त्याचा अहवाल सात दिवसात सिडको कडे तसेच मुख्य दक्षता अधिकारी तथा मुख्य नियंत्रक ,अनधिकृत बांधकाम विभाग नवी मुंबई सादर करण्यास सांगितले आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कळंबोली मध्ये लोखंड पोलाद बाजार समितीचे मोठे कार्यालय तसेच त्या परिसरात ९०० हुन अधिक भूखंड आहेत. अशाच भूखंडाच्या जागेवर अतिक्रमण करून काही लोकांनी आपले बेकायदेशीर धंदे सुरू केले आहेत. गॅस चोरी करणे, गाड्यांचे पार्ट चोरी करणे अशा घटना या ठिकाणी घडतच असतात. बहुतेक वेळा याबद्दलच्या तक्रारी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात येतात. परंतु आता पर्यंत शासनाने या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे याचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढत चाललेले आहे. आणि आता तर यामध्ये त्यांच्याच अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. आता लोखंड पोलाद बाजार समितीच्या वतीने काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













