रोह्यातील डबीर डेअरी जिंकते ग्राहकांच मन पहा शुद्धतेची नवीन ओळख

रायगड (रोहा) – गेल्या ३-४ महिन्यापुर्वी रोह्यातील एका स्थानिक व्यक्तीने कोणतीही पार्शवभूमी नसताना डेअरी सुरु केली,रोह्यात अनेक गुजराती मारवाडी यांचा दूध व्यवसायात जम बसला आहे, तरीसुद्धा या व्यक्तीने जोखीम पत्करून डेअरी सुरु केली, डेअरी चे मालक फुरकान डबीर हे रोह्यातील लोकांना चांगल्या प्रकारचे आणि 
अल्प दरामध्ये दुग्धजन्य पदार्थ पुरवितात तसेच कमीत कमी दरात लोकांना दुग्धजन्य पदार्थ पुरविण्याचा डबीर यांचा मानस आहे. सुरवातीला डबीर यांना खूप अडचण आली पण आज ही डेअरी आपल्या सेवेमुळे आणि दर्जेदार उत्पादन वितरित करीत असल्यामुळे रोहेकारांची मन जिंकत आहे, कोणत्याही प्रकारे भेसळ नसलेलं आणि मार्केट पेक्षा कमी भावाने दूध,दही तूप, ताक या गोष्टी लोकांना उपलब्ध होत असल्यामुळे अनेक लोकांची पहिली पसंद डबीर डेअरी आहे. श्रीखंड, आईस क्रिम, शीतपेय इत्यादी गोष्टी सुद्धा या दुकानात मिळतात. ग्राहकांच्या सोबत सुसंवाद,ग्राहकांची फसवणूक न करणे, घरपोच सेवा, मार्केट पेक्षा कमी भावाने विक्री या मुळे ही डेअरी अल्प काळत प्रसिद्ध झाली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













