पुई ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष, सामना चुरशीचा

रायगड (रोहा) – रोहा तालुक्यात 5 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असुन यामधे नेहमीच बहुचर्चेत असलेल्या पुई ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . सरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही तुल्यबल्य उमेदवार सामोरा समोर उभे ठाकल्याने सामना चुरशीचाच असल्याचे बोलले जात आहे.रायगड चे खासदार सुनिल तटकरे यांच्या आंबेवाडी जि. प. मतदार संघातील व कोलाड पासुन हाकेच्या अंतरावरिल सदर ग्रामपंच्यायत आहे. जुन्या बुजुर्गमंडळीनी सुनिल तटकरे याना या ग्रामपंच्यायतीत राजकिय ताकद दिली होती. मधला काही काळ पुई ग्रामपंच्यायत शेकाप च्या ताब्यात होती. मात्र तरुण मतदार झाल्यानंतर बदल झाले . ही
ग्रामपंच्यायत आज पर्यंत राष्ट्रवादी च्या अधिपत्याखाली आहे.सध्या केंद्रात भाजपचे राज्य आहे, व महाराष्ट्रात देखील भाजपा व शिंदे गटाचे सरकार असल्याने जशी वरच्या राजकारणात हवा बदलते तसे ग्रामपंच्यायत निवडणुकीत देखील मतदार सुशिक्षीत असल्याने हवा बदलू शकते. पुई ग्रामपंच्यायतीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुषाली संजय मांडलूस्कर तर विरोधी पक्षाकड़ुन अस्मिता अनंत सानप या उमेदवारी रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. दोन्ही उमेदवार यांचे पती तुल्यबल्य आहेत. अनंत सानप हे देखील राष्ट्रवादी पक्षामधे होते. मात्र त्याना उमेदवारी दिली नाही त्यामूळे त्यानी राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी करित आपल्या पत्नीला उमेदवारी रिंगणात उतरवले आहे. व राजकिय लढाईस सज्ज झाले आहेत अनंत सानप यांचा गावात सामजिक दबदबा आहे . तर राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनिल तटकरे व ताई, भाई यांचे विश्वास जानी अल्प काळात संपादित केला.व त्यांचे खुप मोठे पाठबल ज्याच्या पाठीशी आहे. असे सर्वाना सुपरिचित असे संजय मांडलूस्कर यानी अपल्या पत्नीला उमेदवारी रिंगणात उतरविले आहे. त्यांचा जनसंपर्क खुप आहे. नेहमीच गावातील तरुण वर्ग व सामजिक कार्यात सहभागी असतात. एकंदरीत तुल्यबल्य उमेदवार सामोरा समोर उमेदवारी रिंगणात उभे राहिले आहेत. त्यातच थेट सरपंच निवडणूक असल्याने निवडणूकित कोन बाजी मारेल हे सांगने कठिण होते. पुई ग्रामपंच्यायतीत दोनी उमेदवार हे वजनदार व संपर्कातले असल्याने दोन्ही नेत्यांच्या पाठी लोकांचा राबता दिसत आहे. त्यामूळे पुई ग्रामपंच्यायतीत कोन बाजी मारणार याची सर्वत्र चर्चा असुन या ग्रामपंच्यतीच्या निकालाची उस्तूकता सर्वाना लागुन राहिली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













