रत्नागिरी ता. खेड, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भर देणार आमदार योगेशदादा कदम

रत्नागिरी (खेड) – अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ खेड शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा खेड तालुक्यातील ऐतिहासिक गोळीबार मैदानावरती संपन्न होत आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खेड दापोली मंडणगडचे लोकप्रिय 
आमदार योगेशदादा कदम हे उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी प्राथमिक शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढत, शिक्षकांनी कोरोना कालावधीत अतिशय नियोजनबद्ध काम करून प्रशासनाला सहकार्य केले व कोरोना वरती मात करण्यात यश मिळवले. शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात याची 
जाणीव मला आहे. या शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितच येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण प्रयत्न करणार असून, खेड तालुक्यातील शिक्षकांसाठी शिक्षक भवनासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडून आपण पूर्ण करून घेणार असल्याचे अभिवचन यावेळी आमदार योगेश कदम यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना दिले. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शशिकांत चव्हाण, माजी सभापती श्री विजय कदम, सचिव श्री सचिन धाडवे, सैतवडेकर, कौशल चिखले आनंद घोले याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते.
अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना शाखा खेडच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमादरम्यान आमदार योगेशदादा कदम यांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. या स्पर्धा यशस्वीतेसाठी खेड तालुका अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री सुखदेव पवार राज्य संयुक्त सरचिटणीस श्री के. एम. चिकणे, श्री. देवघरकर, श्री. अनंत करजवकर, श्री. दत्ताराम निकम, श्री. संजित घाग, श्री. किशोर देसाई, श्री. भास्कर जंगम, श्री. राजेंद्र बेलोसे, श्री. मिलिंद नलावडे, श्री. लक्ष्मण चोरगे, श्री. संदिप चव्हाण, श्री. पवन पवार, श्री. पांडुरंग शिंदे, श्री. विक्रम कापसे, श्री. अमोल राठोड, श्री. पुरुषोत्तम देशमुख, श्री. समाधान चव्हाण, श्री. संतोष चाटे, श्री. श्रीनिवास मोरे, दिलवर वळवी, श्री. सुनिल कटरे, श्री. नितीन डोईफोडे, श्री. संजय जाधव आदी सभासदांनी मेहनत घेतली. सुत्रसंचलन श्री. संजित घाग यांनी तर आभार श्री. अनंत करजवकर यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













