आ. शेखरजी निकम यांचे शुभहस्ते AOPL आॕरगॕनिकचे आज चिपळूण येथे लाॕचींग

रत्नागिरी (खेड) – अभिकृष्णा आॕरगॕनिक प्रा. लि. या कंपनीच्या AOPL आॕरगॕनिक या सेंद्रिय (विषमुक्त) अन्न पुरवणाऱ्या स्टोअर्सचे मा. आ. शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते आणि मा. डाॕ. प्रशांत बोडके, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख कृषीविद्या तथा 
प्रमुख सेंद्रिय शेती संशोधन केंद्र, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, मा. श्रीमती उमा घारगेपाटील गटविकास अधिकारी, पं.स. चिपळूण, मा. प्रसाद शिंगटे मुख्य कार्यकारी अधिकारी चिपळूण, मा. विजयकुमार नाईकधुरे ITC+ platimum, mi lifestyle global marketing pvt ltd, मा. मकरंद उर्फ आशिष खातू माजी नगरसेवक आणि शहर अध्यक्ष भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण येथे आज मोठ्या उत्साहात लाॕचींग करण्यात येणार आहे.
रासायनिक खते वापरून केलेल्या शेतीचे शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच सेंद्रिय (विषमुक्त) धान्याची वाढती मागणी लक्षात घेता. हे AOPL ऑरगॅनिक स्टोअर्स चिपळूण येथे सुरु होत आहे. हे आॕरगॕनिक स्टोअर्स कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतातील सेंद्रिय धान्य खरेदी करून ते रिपॅकिंग करून AOPL आॕरगॕनिक ब्रँड म्हणून या स्टोअर्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे. 
त्यामुळे शेतकऱ्यांचा मालही खरेदी होणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. समाजामध्ये ज्याची गरज आहे असा एक वेगळा सेंद्रिय अन्न (विषमुक्त अन्न) हा विषय घेऊन आम्ही मार्केटमध्ये उतरलो आहोत. आपल्या सर्वांच्या शुभ आशिर्वादाची गरज आहे. त्यामुळे पटेल ट्रेड सेंटर गाळा नं. ७ पहिला मजला, चिपळूण बाजारपेठ, चिपळूण – गुहागर रोड येथील AOPL आॕरगॕनिक शाॕपीला जरुर भेट द्या. त्याचबरोबर ब्रँडच्या लाॕचींगनिमित्त त्यादिवशी मालाच्या खरेदीवर १०% सवलतही मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा जरुर फायदा घ्यावा. असे या कंपनीच्या संचालिका सुनीता गावकर यांनी सांगितले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













