कोलाड येथील हाॅटेल अतिथीच्या मालकास अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी माणगाव कोर्टाचा दणका.?

रायगड (रोहा) – कल्याण येथील अल्पवयीन बालकामगार मुलीस कामाचे आमिष दाखवून कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मैजे वरसगाव ता,रोहा,जि, रायगड,येथील हॉटेल अतिथी रेस्टारंट व लॉजिग येथे सदर हॉटेलचे मालक दिगंबर गणपत फोटफोडे,याने दि,२१फेब्रुवारी २०२०ते २६फेब्रुवारी हॉटेल अतिथी पहिला मंजला रुम नंबर १०२,मध्ये बक्तकार केला,

संबंधित हॉटेल मालक दिगंबर गणपत फोटफोडे,याच्यावर पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल होऊन दिनांक ७ डिसेबर २०२२ रोजी माणगाव न्यायालय यांनी, माणगाव विशेष न्यायालय व सत्र न्यायाधिश श्री.हर्षल भालेराव,यानी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीती नंतर आरोपीस दोषी ठरवून दिनांक ७/१२/२०२२/ रोजी २० वर्ष सक्तमजूरी व रूपये २,६५०००/ दंडाची शिक्षा ठोठावली आहे,

सदर खटल्यामध्ये सहा-सरकारी वकील श्री.योगेश तेडूलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले ,वरील घटेनेची सरकारी फिर्याद कोलाड पोलीसानी घेतली व भा,द,वि,सं,कलम ३७६,(एन),३७६ (३), ५०६, सह पॉक्सो कलम ४,६,८,अन्यवे गुन्हा दाखल केला,या गुन्ह्याचा तपास पी.एस.तायडे,सहा.पोलीस निरीक्षक कोलाड पोलीस ठाणे यांनी केला व आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले,सदर गुन्ह्यात पिडीत मुलीची साक्ष व वैधकिय पुरावा महत्वाचा ठरला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













