शिक्षण परिषदेला तंत्रस्नेही शिक्षक श्री प्रदीप पडवाळ यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन

रत्नागिरी (खेड) – मांडवे प्रभाग स्तरिय शिक्षण परिषद नुकतीच तळे झोळीची वाडी शाळेत संपन्न झाली. यावेळी मांडवे बीट विस्तार अधिकारी श्री. फकिर सर, कळंबणी केंद्राचे केंद्रीय प्रमूख श्री. संजय 
दरेकर सर, तळे केंद्राचे केंद्रीय प्रमूख श्री. करजवकर सर, दहिवली केंद्राचे केंद्रीय प्रमूख श्री. सुखदेव पवार सर, आदर्श तंत्रस्नेही शिक्षक श्री. प्रदिप पडवाळ सर, ऍडव्होकेट श्री. अश्विन भोसले सर, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक यांची प्रमुख उपस्थिती होती. दीक्षा 
ॲपचा अध्यापनात वापर, स्मार्ट टीव्हीचा अध्यापनात वापर, excel प्रत्यक्ष मोबाईलवर वापर, युट्युब व्हाट्सअप फेसबुक चा वापर व सिक्युरिटी, गुगल लिंक चा वापर या मोबाईलवरील नवीन तंत्रज्ञानाचा अध्यापनात कसा वापर करावा याबाबत सखोल 
मार्गदर्शन श्री. प्रदिप पडवाळ सर यांनी केले. श्री. पडवाळ सर यांनी कोरोना कालावधीत अनेक शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन तंत्रस्नेही शिक्षक बनविले. रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्यांचा उत्कृष्ट तंत्रस्नेही पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या कार्यक्रमात ऑनलाईन गाईड मार्गदर्शनात खेड तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक श्री. मंगेश झावरे, श्री. प्रभाकर कोळेकर व इतर शिक्षकांच्या वतीने श्री. पडवाळ सर यांना 
सन्मानित करण्यात आले. ऍडव्होकेट श्री.अश्विन भोसले यांनी सायबर सुरक्षा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनंत मोहिते, श्री. संतोष बुरटे, सौ. दिपाली खेडेकर, श्री. विष्णू भोसले तसेच बीटातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













