नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिल्ली येथे दुसरी ओपन इंडियन किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडली – आजचा महाराष्ट्र

दिल्ली येथे दुसरी ओपन इंडियन किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडली

पत्रकार जितीन शेट्टी

रायगड (पनवेल)- दिल्ली येथे २ ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दुसरी ओपन इंडियन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा पार पडली. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री रितिका सिंग सालाखडूस चित्रपट व रोमिओ देसा(क्रॉटिया)चेअरमन टेकनिकल कमिटी वाको.युरी लक्टिकोव(इस्टोनिया)चेअरमन रेफ्री कमिटी रिंग स्पोर्ट्स वाको यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेत 3 देश व ८०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पनवेल, पेण व

माणगाव तालुक्यातील ४ खेळाडूंनी यात सहभाग घेतला व चमकदार कामगिरी दाखवत विजयी झाले. त्याची नावे खालील प्रमाणे ,सौम्या पिंपळे – २ सुवर्ण पदक,ऋग्वेद जेधे – १ सुवर्ण,१ कास्य.अस्मि गुरव – १ सुवर्ण पदक. केदार खांबे – १ कास्य पदक.महाराष्ट्र राज्याच्या टीमला अध्यक्ष निलेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.भारताचे कोच जयेश चोगले तसेंच अध्यक्ष अम्याचुअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांनी मार्गदर्श केले.युथ कराटे स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र पेण क्लासच्या खेळाडूंचे प्रशिक्षक संतोष मोकल सर,विकास सर,विजय सर,दिपक सर,मिलन सर, योगेश सर, मंदार चवळकर सर ,कु.दिक्षा जैन , प्रगती मॅडम, तसेच शुभम सर ,प्रीतम सर ,कंकेश सर ,कमलाकर सर, अभिषेक सर ,अजय सर, वैभव राहटे यांचे व खेळाडूंचे अभिनंदन किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांनी केले व सर्वत्र पनवेल व रायगड जिल्ह्यात विजयी खेळाडूंवर कौतुकाचे व अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]