नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी… डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे उपक्रम – आजचा महाराष्ट्र

माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी… डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे उपक्रम

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)- दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ मंगळवार कोंकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यासाठी एक दिवस, म्हणजेच शेतकरी हा आपल्यासाठी वर्षभर शेतात राबतो आणि आपल्या अन्नाची गरज

पूर्ण करतो या अनुषंगाने विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला त्यात कोंकण कृषी विद्यापीठाचे कृषीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बोडके सर, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नरंगलकर सर, डॉ. करमरकर सर, वनस्पती रोग शास्त्र विभाग प्रमुख डॉ. जोशी सर विस्तार विभागाचे सहाय्यक अधिकारी श्री. समीर उसरे आणि त्यासोबतच कृषि कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत कृषी प्रेरणा (उधळे पाष्टेवाडी) आणि कृषीरत्न( उधळे ,मधलीवाडी)

विद्यार्थी यांनी मिळून श्री महादेव लाड सौ. वनिता लाड यांच्या शेतावर जाऊन वाकवली भाजीपाला संशोधन, वाकवली येथून कंगर आणि कनक बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते.. त्या पिकाची काढणी करून देण्यात आली.. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि

समस्या यावर चर्चा करण्यात आली. डॉ. बोडके सरांकडून सेंद्रिय शेतीवर विशेषभर देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातली श्री. गणपत मुकनाक श्री. संतोष बोंबले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]