नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तहसीलच्या पुरवठा विभागातील सुनील येलवे व प्रकाश खांडेकर यांची बदली – आजचा महाराष्ट्र

खेड तहसीलच्या पुरवठा विभागातील सुनील येलवे व प्रकाश खांडेकर यांची बदली

पत्रकार – राजेंद्र दळवी 

रत्नागिरी खेड :- येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून सुनील एकनाथ येलवे यांची दापोली तहसीलमधील पुरवठा विभागात गोदाम व्यवस्थापक – श्रेणी २ याठिकाणी बदली झाली आहे.तर पुरवठा लेखा अव्वल कारकून प्रकाश खोडेकर यांची गुहागर तहसीलमधील पुरवठा विभागामध्ये निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. सुनील येलवे यांनी सन २०१७ मे २२ असे ६ वर्षे पुरवठा विभागात अव्वल कारकून म्हणून उत्मरित्या काम केले. तर प्रकाश खोडेकर यांनी पुरवठा निरीक्षक म्हणून साडेतीन वर्षे काम केले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेमधून श्री. येलवे व श्री. खांडेकर या दोघांच्याही कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येऊन

त्यांना उर्वरित सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या दोघांचीही बदली मा. जिल्हाधिकारी यांच्या क्रमांक आस्थापना १ / पुरवण | समायोजन | २०२२ जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, दि. १९/१०/२०२२ अन्वये झाली असून त्यांना येथील तहसीलदार सौ. प्राजक्ता घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येऊन त्यांचा निरोप समारंभ दि. २० ऑक्टोबर

रोजी करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार श्री. सिनकर महसूल नायब तहसीलदार प्रताप राठोड, अप्पर तहसीलदार अमृता साबळे ,श्री.घुले, श्री. कसबे, श्री. अलमोड, अक्षय पवार, गावीत, श्री. सावंग ,श्री.काळबोडे आदींसह सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. श्री. येलवे व श्री. खांडेकर यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी बदलीच्या ठिकाणी हजर होऊन आपापल्या पदांचा भार स्विकारला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]