पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणारी प्रभावी योजना जल जीवन मिशन आयोजित विष्णू पवार
पत्रकार राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड):-जल जीवन मिशन म्हणजे जेथे घर तेथे नळ,जेथे नळ तेथे पिण्याचे शुद्ध पाणी अशी ही केंद्र शासनाची पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी समस्या सोडवणारी एक शाश्वत योजना 
आहे असे बोलताना ग्रामीण पाणी पुरवठा खेड चे उप अभियंता श्री.विष्णू पवार साहेब वाडी जैतापूर येथे आयोजित जल जीवन मिशन सभेला संबोधित करताना म्हणाले.जल जीवन बद्दल असलेले समज गैरसमज,ग्रामस्थांच्या शंका, समस्या व शासन निर्णय काय आहे याचं योग्य प्रकारे निरसन करण्यासाठी ग्रामपंचायत मांडवेच्या सरपंच सौ. सुनिता कासार यांनी वाडी जैतापूर या ठिकाणी सभा
आयोजित केली होती.या सभेला उप अभियंता श्री. पवार साहेब,ठेकेदार समाधान जाधव, ग्रामसेवक दीपक कदम,स्थानिक ग्रामस्थां बरोबर मुंबईकर सुद्धा बहु संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या व शंका सविस्तर ऐकून त्यावर प्रत्येकाला समजेल अशा सोप्या भाषेत त्यांचे निरसन केले.एका प्रश्नाचे समाधान करताना पवार साहेब म्हणाले की प्रत्येक कुटुंबाच्या घरापर्यंत मोफत नळ जोडणी करून दिली जाईल त्या साठी कुणी एक रुपयाची जरी मागणी केली तर आमच्याशी संपर्क करावा .मात्र ही योजना भविष्यात प्रभावी चालावी या साठी सर्वांना लोक वर्गणीच्या माध्यमातून सहभागी व्हावे लागेल असेही ते म्हणाले. ग्रामस्थ व मुंबईकर यांनी मांडलेले प्रश्न,शंका,समस्या यांचं योग्य निरसन केल्या बद्दल पोलीस पाटील बाळकृष्ण कासार यांनी उप अभियंता पवार साहेब,सरपंच सौ.सुनिता कासार,ग्रामसेवक दीपक कदम ,ठेकेदार समाधान जाधव यांचे आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













