नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न
पत्रकार राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड):-नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी येथे सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान मुंबई( रजि.) व श्रीराम ग्रामीण विकास मंडळ सातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी सातगाव
पंचक्रोशीतील तिसंगीसह कुळवंडी व खोपी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जगन्नाथराव मोरे,तर प्रमुख अतिथी अँड.श्री आनंदराव भोसले व विशेष अतिथी श्री. नंदकिशोरराव भोसले यांची उपस्थिती लाभली. सातगाव पंचक्रोशी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची त्या दृष्टीने मानसिक तयारी व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमासाठी माननीय श्री सत्यवानजी रेडकर सर, कनिष्ठ अनुवादक, मुंबई सीमाशुल्क अधिकारी, राजस्व विभाग- भारत सरकार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री सत्यवानजी रेडकर सर यांनी आपल्या ओघावत्या वाणीने स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यास,सातत्य व मेहनतीला पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या प्रभावशाली वक्तव्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा बद्दलची उत्सुकता निर्माण होण्यास मदत झाली. उपस्थित मान्यवर श्री. जगन्नाथ राव मोरे अँड.श्री. आनंदराव भोसले श्री. देवरामराव भोसले श्री.नंदकिशोरराव भोसले श्री. वसंतराव भोसले सौ. ज्योतीताई भोसले यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून 
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देवरामराव भोसले मुख्य कार्यवाह सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान यांनी केले. यानंतर श्री. शिवशंकर माध्यमिक विद्यालय कुळवंडी, नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल अँड जुनियर कॉलेज खोपी येथील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तीनही हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.विभुते सर, श्री. मोरे सर, श्री. मिश्रा सर, सौ. बामणे मॅडम यांना देखील गौरवण्यात आले. गुणगौरव सोहळ्याला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी आपले उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले. ज्याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या वक्तृत्व कौशल्याची चुणूक दिसून आली.यानंतर सातगाव ग्रामीण विकास प्रतिष्ठान मुंबई (रजि.) व श्रीराम ग्रामविकास मंडळ सातगाव यांच्या वतीने या मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक सन्मा.श्री.सत्यवानजी रेडकर यांना शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अँड. श्री.आनंदराव भोसले यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अँड. श्री.आनंदराव भोसले यांना शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.जगन्नाथराव मोरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. तिसंगी ग्रामस्थ व गावच्या वतीने शिरगाव,खोपी, कुंभाड, मिर्ले, बिजघर, कुळवंडी या गावातील प्रतिष्ठित मान्यवरांना प्रातिनिधिक स्वरूपात व सातगाव ग्राम विकास प्रतिष्ठान मुंबईचे मुख्य कार्यवाह श्री. देवरामराव भोसले यांचा आणि कुळवंडी, खोपी व तिसंगी हायस्कूलचे संस्था पदाधिकारी यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. महिला प्रतिनिधी म्हणून सौ.ज्योतीताई लक्ष्मणराव भोसले सहकार्यवाह सातगाव प्रतिष्ठान व माजी नगरसेविका मुंबई महानगरपालिका त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री.दगडूजी निकम उपाध्यक्ष श्रीराम ग्रामीण विकास मंडळ, श्री. नंदकिशोर भोसले अध्यक्ष श्रीराम ग्रामीण विकास मंडळ, अँड.श्री.आनंदराव भोसले अध्यक्ष नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी व श्री. जगन्नाथराव मोरे अध्यक्ष सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान मुंबई यांनी मनोगत व्यक्त केले. यातून विद्यार्थ्यांना दिशादर्शक मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमासाठी सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान व श्रीराम ग्रामीण विकास मंडळ पदाधिकारी,सदस्य नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळ, विश्वस्त यांचेसह
पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री.अनंत मानाजीराव भोसले उपाध्यक्ष सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान व श्री. संदीपराव भोसले सचिव सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अजित भोसले गुरुजी व श्री.शरद भोसले गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.वामनराव भोसले उपाध्यक्ष श्रीराम ग्रामीण विकास मंडळ यांनी मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.समारोपनंतर उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी सर्व सहभागी विद्यार्थी यांनी स्वादिष्ट भोजनाचा लाभ घेऊन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची सांगता करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













