नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड सोनगाव माठवाडी येथे राष्ट्रीय अभियानांतर्गत पोषण माह साजरा – आजचा महाराष्ट्र

खेड सोनगाव माठवाडी येथे राष्ट्रीय अभियानांतर्गत पोषण माह साजरा

पत्रकार राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :-परिषद महिला व बालकल्याण विभाग व एकात्मिक सेवा योजना प्रकल्प खेड यांच्यातर्फे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह साजरा होत असून तालुक्यातील सोनगाव माठवाडी येथे मातांमध्ये पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

        सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी तसेच बीट स्तरावरील अंगणवाडीसेविका व पर्यवेक्षिकांतर्फे विविध कार्यक्रमांद्वारे पोषण माहसाठी जनजागृती करण्यात येत आहे. यानिमित्त सुदृढ बालक स्पर्धा, पोषण रॅली, गरोदर महिला ओटी भरणे, रांगोळी स्पर्धा तसेच पोषण आहार याबाबत मार्गदर्शन केले जाते. याच कार्यक्रमांतर्गत खेड तालुक्यातील सोनगाव माठवाडी येथे लोटे बिटच्या पर्यवेक्षिका श्रीमती प्रेरणा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

         या कार्यक्रमामध्ये महिलांनी व गरोदर मातांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुजर यांनी केले. यावेळी परशुराम हॉस्पिटल येथील डॉ. गुजर ,लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. टिप्रेसवार यांनी आहार, श्रीमती शिरिषकर यांनी आरोग्य, स्वच्छता बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती पाडवी यांनी केली. कार्यक्रमाला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या सर्व पर्यवेक्षिका, कर्मचारी उपस्थित होते तसेच सोनगाव येथील सरपंच, पोलीस पाटील,सर्व महिला, बचत गट अध्यक्ष, लोटे बिटच्या सर्व सेविका व मदतनीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]