मांडवे ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी सुरेश मोरे यांची निवड
{ पत्रकार राजेंद्र दळवी }
रत्नागिरी(खेड):– ग्रुप ग्रामपंचायत मांडवे ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदी माजी सरपंच सुरेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली.सुरेश मोरे हे माजी सरपंच,सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी 
या पदावर चांगले काम केल्याने ग्रामस्थांनी त्यांची बिनविरोध निवड केली.कोणताही तंटा मिटवण्याचा त्यांच्याकडे विशेष कसब आहे.या निमित्ताने सरपंच सौ.सुनिता कासार,माजी सरपंच नामदेव जाधव,श्रीराम कदम,विजय जाधव,तुकाराम चिकने, 
गजानन जाधव,आमेश मोरे,एकनाथ मोरे,शिवाजी कदम, ज्ञानेश्वर खांबे,उतेकर यांनी सुरेश मोरे यांचा सत्कार केला.या वेळी पोलीस पाटील बाळकृष्ण कासार,ग्रामसेवक दीपक कदम, हरीचंद्र मोरे उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













