नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सागर धप्पाधुळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान – आजचा महाराष्ट्र

सागर धप्पाधुळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) : – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणदे ढाकरवाडी शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक श्री. सागर सुरेश धप्पाधुळे यांचा अविष्कार सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार( सन-२०२२)देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक पुरस्कार शिक्षक

दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. तर ११ सप्टेंबर २०२२ रोजी सोलापूर येथे दीपक आर्वे ( सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कला, क्रीडा,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या अविष्कार सोशल फाउंडेशनने सागर धप्पाधुळे यांच्या कार्याची दखल घेऊन निवड समितीने त्यांची निवड केली. निवड समितीचे खेड तालुका अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, तसेच ऋतुजा चांदिवडे, राहुल तुगांवकर, सचिन गमरे, सिद्राम चटलोड, दिनेश पवार यांनी काम पाहिले. या निवडीमुळे सागर धप्पाधुळे यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सहकारी शिक्षक यांनी अभिनंदन केले. तसेच गावकरी व मित्रमंडळी यांच्याकडून सन्मान करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]