नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उद्योजक कमलाकर दादा कदम यांच्याकडून वरवली नंबर1 शाळेला वॉटर कुलर भेट – आजचा महाराष्ट्र

उद्योजक कमलाकर दादा कदम यांच्याकडून वरवली नंबर1 शाळेला वॉटर कुलर भेट

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड):- वरची हुंबरी गावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री. कमलाकर दादा कदम यांच्याकडून वरवली नंबर एक शाळेला वॉटर कुलर भेट देण्यात आला. हा वॉटर कुलर मिळवण्यासाठी

शाळा व्यवस्थापन सदस्य मनोहर दगडू यादव यांनी विशेष प्रयत्न केले होते. या वॉटर कुलर चे उद्घाटन वरवली ग्रामपंचायतचे सदस्य बाळकृष्ण पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरवली गावच्या सरपंच सौ. स्वप्नाली यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपक यादव ग्रामपंचायत सदस्य संतोष यादव, प्राजक्ता यादव, कमलताई पड्याळ, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष

प्रतिभा यादव, माजी अध्यक्ष अंजली यादव, मुख्याध्यापिका नम्रता पवार मॅडम,संतोष मोरे सर, शैलेश पराडकर सर, विद्या घडशी मॅडम, पोषण आहार ताई संगीता निकम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नम्रता पवार मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश पराडकर सर यांनी केले. तर आभार संतोष मोरे सर व विद्या घडशी मॅडम यांनी मानले. यावेळी शैक्षणिक खर्चातून शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी एक भट्टी शेगडी देखील शाळेला देण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]