नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संगमेश्वर कोसुंब गावात जगद्गुरू श्री. नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा मिरवणूक काढून संपन्न झाला – आजचा महाराष्ट्र

संगमेश्वर कोसुंब गावात जगद्गुरू श्री. नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा मिरवणूक काढून संपन्न झाला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड):- श्री गुरुदेव अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री.स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच पिठाचे उत्तराधिकारी

प. पू . कानिफनाथ महाराज यांच्या कृपार्शिवादाने आज दि.१० सप्टेंबर २०२२ रोजी संगमेश्वर येथे कोसुंब गावी जगदगुरु श्री. नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादूका दर्शन सोहळा पिठाचे उतराधिकारी प पू . कानिफनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संप्पन्न झाला .सकाळी ९. वाजता जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत निशाण

धारी बंधू – भगिणी कळराधारी महिला तसेच आध्यात्मिक देखावे काढून मिरवणूक संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या पादूका पूजनाने करण्यात आली. तसेच ज .न म. प्रवचनकार सोमदे आप्पा यांनी प्रवचन सेवा पार

पाडली गुरुंवर नितांत प्रेम करा श्रद्धा ठेवा आणी त्यांनी सांगितलेल्या शिकवणींचे अनुकरण करा असे केले तर जिवनात नक्कीच यशस्वी होता येते .संस्थानाच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत

शेतकरी बांधवांना १०० फवारणी पंप व ७०० नारळ रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसूंब

या शाळेला अग्नीशमक किटचे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा आ . श्री शेखरजी निकम साहेब ( संगमेश्वर चिपळूण मतदार संघ )मा. राज्य मंत्री श्री रविंद्रजी माने साहेब मा .आ . श्री. राजनजी साळवी साहेब ( लांजा – राजापूर मतदार संघ )मा . श्री रोहणजी बने(मा .जिल्हा परिषद अध्यक्ष )मा . श्री प्रध्यून्म माने

( संचालक – शिक्षण प्रसारक प्रबोधीनी आंबव )कु .पूजा बोथरे सरपंच ग्रा.पं. कौसूंब इ .मान्यवर उपस्थित होते सदर सोहळ्या प्रसंगी १९५ भाविकांनी उपासक दिक्षा दिली सदर कार्यक्रमा प्रसंगी सूमारे ५००० भाविक श्रद्धेने आले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]