नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्राहक चळवळ सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवा-श्री. चंद्रकांत मांडवकर – आजचा महाराष्ट्र

ग्राहक चळवळ सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवा-श्री. चंद्रकांत मांडवकर

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)-संगमेश्वर -ग्राहक चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजचे आहे. तरच ग्राहकांची विविध बाबींमध्ये होणारी फसवणूक

टाळता येईल. असे उद्गार ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांनी पूज्य गोळवलकर गुरुजी प्रतिष्ठान गोळवली येथे झालेल्या जिल्हा व कोकण प्रांत सभेमध्ये काढले. सुरुवातीला स्वामीं विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून संघटन मंत्राने सभेला सुरुवात झाली. महिला जागरण या विषयावर प्रांत सदस्या सौ प्रणिता धामणस्कर यांनी तर सौ. वेदा प्रभुदेसाई यांनी

आर्थिक व्यवहार पारदर्शक कसे ठेवायचे, सदस्यता वाढ करणे या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य श्री. विजय भागवत यांनी विविध आयाम सांगून युवकांनी उद्योजक बनावे व देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलावा असेही सांगितले. राष्ट्रीय सहसचिव सौ. नेहा ताई जोशी यांनी प्रांत तालुका अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे जागृती निर्माण करावी असे सांगितले. कोकण प्रांत अध्यक्ष श्री. चंद्रकांत झगडे यांनी सदस्यता वाढ ग्राहकांचे प्रश्न, तक्रारी, यावर मार्गदर्शन केले.सर्व तालुका अध्यक्ष यांनी केलेल्या कामांचा, उपक्रमांचा व सदस्य नोंदणी अहवाल याचे वाचन केले. या कार्यक्रमाला कोकण प्रांत प्रचार प्रमुख श्री. चाळके, खेड तालुकाध्यक्ष श्री. लक्ष्मण आखाडे संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री. दीपक पोंक्षे गुहागर तालुका अध्यक्ष श्री. गणेश धनावडे,चिपळूण तालुका उपाध्यक्ष श्री. जगदीश वाघुळदे, श्री विनायक ओक श्री. अनंत पाध्ये श्री अजित शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. श्री प्रकाश सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर श्री लक्ष्मण आखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अखेर सर्वांनी पसायदान म्हणून सभेची सांगता झाली .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]