चिपळूण पिंपळी बुद्रुक येथे मोटार सायकल स्वारांचा भीषण अपघात

रत्नागिरी (खेड)-काल दिनांक ८/०९/२०२२ रोजी ता. चिपळूण पिंपळी बुद्रुक, चिपळूण- कराड रोडवर भीषण अपघात घडला रात्री ०८:१५ वाजता मोटर सायकल वरून जाणाऱ्या दोन इसमांचा अपघात झाला. अपघात ठिकाणी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान चिपळूण येथील रुग्णसेविका- चालक श्री. गणेश लहू जाधव यांना संपर्क होताच त्यांनी तात्काळ
घटनास्थळी धाव घेऊन त्या दोन्ही रुग्णांना मदत केली. त्यातील एकाला चिपळूण मधील अपराध हॉस्पिटल मध्ये दाखल केलं. व दुसऱ्याला मिठाई हॉस्पिटल येथे दाखल केलं. दोन्ही इसमांवर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यामुळे सध्या त्यांची परिस्थिती चांगली आहे. अपघातात समयी तत्परतेने मदत करणारे श्री. साहिल संतोष रांगले व श्री. गौरव दत्ताराम रेमजे यांचे उपस्थितांनी खूप खूप कौतुक केले. वेळीच मदत केल्याने अपघातग्रस्तांचा जीव वाचला. चिपळूण – कराड रोडवर अपघातांची संख्या वाढत असल्याने स्थानिकांकडून गतिरोधकची मागणी केली जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













