नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रुठे बंधूंनी साकारली हुबेहूब आई एकवीरा देवीची प्रतिकृती मनसे कर्जत तालुका अध्यक्षा सौ.आकांक्षा ताई शर्मा – सावंत यांनी घेतले आई एकवीरा देवीच्या मंदिराची प्रतिकृती असलेली बाप्पाची आरास व गणरायाचे दर्शन… – आजचा महाराष्ट्र

रुठे बंधूंनी साकारली हुबेहूब आई एकवीरा देवीची प्रतिकृती मनसे कर्जत तालुका अध्यक्षा सौ.आकांक्षा ताई शर्मा – सावंत यांनी घेतले आई एकवीरा देवीच्या मंदिराची प्रतिकृती असलेली बाप्पाची आरास व गणरायाचे दर्शन…

रायगड कर्जत प्रतिनीधी,

रायगड (कर्जत): कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील रुठे बंधूंनी यंदाच्या गणेशोत्सवात आई एकवीरा देवीच्या मंदिराच्या गभाऱ्याची आकर्षक प्रतिकृती असलेली गणरायाची आरास साकारली आहे.

गणेशोत्सव येणार म्हणल की,जो तो आपल्या घरात नवनवीन कलाकृती असलेली गणरायासाठी आरास साकारण्यासाठी प्रयत्न करत असतो.याच उद्देशाने उमरोली गावातील जितेंद्र रठे,प्रवीण रूठे,नरेश रुठे, या भावंडांनी आपल्या घरात लोणावळा कार्ला येथील

आई एकवीरा देवी मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिकृती असलेली गणरायाची आरास साकारली आहे.ही सजावट साकारताना त्यांनी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही,याची पुरेपूर दक्षता घेऊन,यात त्यांनी कागदी वस्तूंचा वापर करत ही आरास साकारली आहे.तसेच आपण सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे,सर्वांनी समजाप्रती,पर्यावरणापती असलेली आपली जबाबदारी ओळखावी असा संदेश दिला असून ही कलाकृती पाहण्यासाठी कर्जत तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी भेटी देत रूठे बंधूंचे कौतुक करत आहेत.ही कलाकृती पाहून लोक मंत्रमुग्ध होत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]