नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ए. आर. व्हेंचर निर्मित. मिसेस क्लासिक श्रावणी क्वीन या स्पर्धेत मिसेस सानिया सिराज मुलानी(मुंबई पोलिस) यांनी द्वितीय क्रमांक पटकावत उत्तम व्यक्तिमत्त्व असाही किताब मिळविला – आजचा महाराष्ट्र

ए. आर. व्हेंचर निर्मित. मिसेस क्लासिक श्रावणी क्वीन या स्पर्धेत मिसेस सानिया सिराज मुलानी(मुंबई पोलिस) यांनी द्वितीय क्रमांक पटकावत उत्तम व्यक्तिमत्त्व असाही किताब मिळविला

मुंबई प्रतिनिधी,

मुंबईमुंबई पोलिस म्हणल की खडतर कामगिरी २४ तास डोक्यावर ताण अशा प्रकारच्या खडतर कामगिरीतून, कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते तरीही या

सगळ्या गोष्टीं वर मात करत वेळात वेळ काढून मिस. सानिया सिराज मुलानी यांनी महाराष्ट्रातील मानला जाणारा महाराष्ट्र श्रावणी क्वीन सुंदर व्यक्तिमत्त्व २०२२ चा द्वितीय क्रमांक पटकावला

व पोलिस डिपार्टमेंटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला तसेच समस्त महिलां समोर एक उत्तम आदर्श ठेवला, की काम, जबाबदार्‍या कितीही असो मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

या महत्त्वाच्या गोष्टीचे औचित्य साधून खार पोलिस ठाण्यातील समस्त पोलिस वर्गाने मिस सानिया यांचा सत्कार केला. सत्कार समारंभ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मोहन माने यांच्या हस्ते

पुष्पगुच्छ भेट देऊन झाला. तसेच यावेळी उपस्थित पी. आय. श्री. काटकर साहेब, पी. आय. श्री. अंचलवार साहेब, ए. पी. आय. श्री. कणसे साहेब, पी. एस. आय. श्री. गवळी साहेब, पो. कॉ.पूजा कारंडे

मॅडम , पो. कॉ. अनिशा मोरे मॅडम या सर्वांनी मिस. सानिया यांचे अभिनंदन करत खूप कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. या कामगिरीमुळे मिस. सानिया यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]