मा.श्री चंद्रकांत पाटील साहेब यांचा वाढदिवस वाशीतील माथाडी भवन येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम करत जल्लोषात साजरा
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई– महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संयुक्त सरचिटणीस, कामगारांचे, रिक्षा चालकांचे, गोरगरिबांचे कनवाळू नेते माजी नगरसेवक मा. श्री चंद्रकात पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे

औचित्य साधून रक्तदान शिबीर, गोरगरिबांना अन्नदान तसेच तरुणांना योग्य मार्गदर्शन अशा वेगळया पद्धतीने साजरा झाला यावेळी उपस्थित

मा. आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब, मा.आमदार .श्री नरेंद्रजी पाटील साहेब, मा. आमदार श्री. शशिकांतजी शिंदे साहेब तसेच इतर
मान्यवर यांनी व्यासपीठावर श्री. चंद्रकात पाटील साहेबांच्या सामाजिक, राजकिय व कामगार क्षेत्रातील अलौकिक कार्याबद्दल तोंडभरून कौतुक केले. यावेळेस अनेक मान्यवरांनी श्री. चंद्रकांत पाटील साहेबांच्यबद्दल स्तुतीपर संभाषणे केली.
तसेच कै. डि. आर. पाटील रिक्शा चालक मालक युनियनचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव साहेबांनी अनेक रिक्षा चालकांच्या उपस्थितीत श्री चंद्रकात पाटील

साहेबांना पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच श्री संतोष जाधव यांनी श्री. चंद्रकात पाटील साहेबांबद्दल गौरवोद्गारपर संभाषण करताना गोरगरीब रिक्षाचालकांना कोणत्याही अडचणीत मदत करणे, कोणत्याही कामासाठी अहोरात्र हजर असणे 
यामुळे समस्त रिक्षाचालकांमध्ये श्री. चंद्रकात पाटील साहेबांच्या प्रति खूपच आदर व प्रेम आहे यावेळी श्री. संतोष जाधव यांच्या सहित संघटनेचे प्रतिनिधी तसेच बहुसंख्येने रिक्षाचालक उपस्थित होते अशाप्रकारे श्री. चंद्रकात पाटील साहेबांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













