खेड मनसे तर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न

मनसे श्री चा मान – शुभम दिवेकर ,मनसे युवा चा मान – निखील नलावडे
रत्नागिरी (खेड):-महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या विद्यमाने आयोजित छञपती शिवाजी महाराज चौक,खेड येथे दहिहंडी उत्सव दिनी शरीर सौष्ठव स्पर्धा युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा मध्ये संपन्न झाली

या शरीर सौष्ठव स्पर्धेत .मनसे श्री. शुभम संतोष दिवेकर ( बाॅडी गॅरेज, खेड )मनसे युवा कु. निखील अरुण नलावडे ( जननी काॅटेश्वेरी जिम , शिवतर) यांनी मान मिळविला.

या शरीर सौष्ठव स्पर्धेत पंच म्हणून श्री. नंदकिशोर शिंदे,श्री भारत बजागे,श्री. दिलीप कारेकर,श्री राज कारेकर, श्री महेश वादक,यांनी उपस्थिती लावली.तसेच इतर मान्यवर, शरीर सौष्ठव प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













