नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगडमधील गोविंदाच्या आशा पल्लवित दोन वर्षांंनंतर दहीहंडी उत्सव साजरा होणार – आजचा महाराष्ट्र

रायगडमधील गोविंदाच्या आशा पल्लवित दोन वर्षांंनंतर दहीहंडी उत्सव साजरा होणार

पत्रकार जितीन शेट्टी

रायगड(पनवेल)-रायगडतील गोविंदा पथकांना शुक्रवारी (ता. १९) साजऱ्याहोणाऱ्या दहीहंडीचे वेध लागले आहेत. तब्बल दोन वर्षानंतर साजरा होणारा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी कंबर कसली आहे.रायगड पोलिस अधिक्षकांच्या दहीहंडी सोहळ्यात गोविंदा पथकांचा हद्दीत १९२८ सार्वजनिक तर जोर दिसून येणार आहे.६२३९ खासगी अशा एकूण ८१६७ हंड्या फुटणार आहेत. गेले दोन वर्षे कोरोनामुळे दहीहंडी फोडण्यावर निर्बंध घातले होते. पण आता हे सारे निर्बंध उठविण्यात आलेले आहेत. शिवाय

सरकारनेही गोविंदांसाठी १० लाखांचे विमाकवच देण्याचे घोषित केले आहे.त्यामुळे शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या आहेत.अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या लावल्या जाणार आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात आली मानाच्या दहीहंड्या फोडण्याबरोबरच लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाटी गोविंदा पथकांनीही कंबर कसली आहे.यासाठी गेले महिनाभर पथकातील खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत.रायगड पोलिस दलातील सहाय्यक

पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रायगडात १९२८ सार्वजनिक तर ६२३९ खासगी अशा एकूण ८१६७ दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. तर १६० सार्वजनिक मिरवणुका निघणार आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]