मोफत ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा चिपळूण बहादुरशेख नाका येथे संपन्न

रत्नागिरी (खेड)-आज दिनांक १८/०८/२०२२ गुरुवार रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच प. पुज्य कानिफनाथ महाराज
यांच्या आशीर्वादाने मोफत ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा चिपळूण बहादुरशेख नाका येथे संपन्न झाला.लोकार्पण सोहळ्याला उप. विभागीय पोलिस अधिक्षक श्री. सचिन बारी साहेब, तहसीलदार श्री.
जयराजसुर्यवंशी साहेब, पोलिस इन्स्पेक्टर सौ. पाटील मॅडम, पोलिस उपनिरीक्षक वंदना कनोज मॅडम, उप विभागीय वैद्यकीय अधिकारी श्री. तायडे साहेब ,मंडळ अधिकारी श्री. जाधव साहेब तसेच खेर्डी गावचे माजी सरपंच श्री. प्रकाश
पाथरवट ज. न. म. प्रवचनकार श्री.परशुराम जाधव महाराज,ज. न. म. प्रवचनकार श्री. महेंद्र कदम महाराज,युवा पीठ निरिक्षक श्री. अविनाश जागुष्टे,पिठ धर्मक्षेत्र प्रमुख श्री. दत्ता मोरे, जिल्हा निरीक्षक श्री. संदीप नार्वेकर दक्षिण रायगड जिल्हा निरीक्षक श्री. सुनील वीर, जिल्हा सेवाध्यक्ष श्री. बाळकृष्ण चव्हाण साहेब तसेच भक्त शिष्य गण उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













